Asus Vivobook 14 Copilot+ PC भारतात लॉन्च; किंमत 65,990 पासून सुरू

Asus Vivobook 14 (X1407QA) ची भारतात किंमत 65,990 रूपयांपासून पुढे आहे आणि तो 22 जुलैपासून Flipkart आणि Asus eShop वरून खरेदी केला जाऊ शकतो.

Asus Vivobook 14 Copilot+ PC भारतात लॉन्च; किंमत 65,990 पासून सुरू

Photo Credit: Asus

Asus Vivobook 14 (X1407QA) मध्ये एक समर्पित कोपायलट की आहे

महत्वाचे मुद्दे
  • लॅपटॉपला 50Wh batteryआणि 65W charging support असणार
  • लॅपटॉपचे वजन 1.50 किलोपेक्षा कमी आहे जे या किमतीच्या श्रेणीतील सर्वात हलक
  • Hinge Mechanism असल्याने लॅपटॉप 180 अंशांपर्यंत उघडू शकतो ज्यामुळे तो पृ
जाहिरात

Asus कडून त्यांचा लेटेस्ट Vivobook 14 (model X1407QA) भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivobook 14 मध्ये Qualcomm चा नवा Snapdragon X series प्रोसेसर आहे. आता हा नवा लॅपटॉप फ्लिपकार्ट वर खरेदीसाठी उपलब्ध आअहे. याची किंमत 65,990 पासून सुरू होते. Vivobook 14 हा AI-powered आणि रोजच्या वापरातील लॅपटॉप आहे. यामध्ये युजर्स अगदी सहज मल्टीटास्किंग करू शकतील. चांगली बॅटरी लाईफ असेल आणि कनेक्टिव्हिटी चांगली असेल. Microsoft Copilot आणि image generation tools सारख्या एआय क्षमता त्यामध्ये असणार आहेत.या लॅपटॉपमध्ये AI NPU chip आहे जी त्यांना Windows 11 AI tools आणि बरेच काही अनुभवण्याची संधी देते ज्यामुळे तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या Copilot AI assistant चा एका क्लिकवर प्रवेश मिळतो.

Asus Vivobook 14 Snapdragon X ची स्पेसिफिकेशन्स

Vivobook 14 व्हेरिएंट्स मध्ये 14-inch IPS display आहे सोबत Full HD+ resolution, 16:10 aspect ratio, 60Hz standard refresh rate आणि low blue light emission tech चा समावेश आहे. हा लॅपटॉप 180 डिग्री पर्यंत उघडतो. hinge mechanism मुळे हा लॅपटॉप अगदी सपाट होतो. या लॅपटॉपचं वजन सुमारे दीड किलो पेक्षाही कमी असेल. त्यामुळे या प्राईज रेंज मधील हा अतिशय हलका लॅपटॉप आहे.

Snapdragon X CPU हा 16GB RAM सोबत जोडलेला आहे. बाजारात अन्य उपलब्ध Copilot+ PCs प्रमाणेच यामध्येही किमान 512GB SSD storage मिळणार आहे. Asus कंपनीने लॅपटॉप कोणत्या रंगामध्ये असेल याची माहिती दिलेली नाही पण जारी फोटो वरून असे सूचित होते की लॅपटॉप एकाच गडद राखाडी रंगाच्या पर्यायात सादर केला जाईल.

Asus ने त्यांच्या लॅपटॉप मध्ये IR camera दिला आहे. ज्यात Full HD resolution आणि privacy shutter button,Windows Hello security unlocking चा सपोर्ट असणार आहे. लॅपटॉप मध्ये कनेक्टिव्हिटी साठी दोन USB 3.2 ports, दोन USB 4.0 Type C ports, HDMI port आणि headphone jack आहे.

लॅपटॉप मध्ये Dolby Atmos सपोर्ट असलेले stereo speakers देखील देत आहे आणि बॉक्समध्ये बंडल केलेल्या अॅडॉप्टरसह बिल्ट-इन 50Wh battery ला 65W चार्जिंग सपोर्ट मिळतो. गेल्या काही महिन्यांत Asus ने AI लॅपटॉपची विस्तृत श्रेणी लाँच केली आहे आणि ब्रँड आता Windows 11 सेगमेंटमध्ये अधिक परवडणारे पर्याय आणत आहे कारण लोक देशातील त्यांच्या जुन्या Windows 10 मशीनवरून अपग्रेड करू इच्छितात.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iPhone Air 2 लाँच टाइमलाइन स्पष्ट; 2026 मध्ये घोषणा होणार असल्याचा दावा
  2. Flipkart ने उघड केला Motorola Signature सिरीजचा पहिला टीझर
  3. दमदार बॅटरी, हाय रिफ्रेश रेट स्क्रीनसह OnePlus Turbo येणार, लीक फोटोंमधून मिळाले संकेत
  4. Oppo K15 Turbo Pro स्पेसिफिकेशन लीक: मोठा कॅमेरा आणि MediaTek Dimensity 9500s अपेक्षित
  5. Galaxy A07 5G सर्टिफिकेशनमधून मोठ्या बॅटरीचे संकेत, आधीच्या मॉडेलपेक्षा वाढ
  6. HMD चे बजेट DUB Earbuds लॉन्च; फीचर्स, बॅटरी लाईफ, ANC आणि किंमत पहा
  7. Xiaomi Watch 5 मध्ये EMG + ECG सेन्सर, हेल्थ ट्रॅकिंगसाठी नवे फीचर्स
  8. Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत Flipkart वर घसरली; Rs 20,000 सूट, एक्सचेंज, EMI ऑफर्स
  9. OnePlus Nord 4 Amazon वर Rs. 24,000 पेक्षा कमी मध्ये खरेदी करा नवा स्मार्टफोन
  10. Oppo Find X8 Pro वर बंपर डिस्काउंट – कमी किमतीत फ्लॅगशिप फोन मिळवा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »