Find N6 मध्ये 2K resolution सह 8.12 इंचाचा अंतर्गत फोल्डेबल LTPO screen आणि 6.62 इंचाचा कव्हर डिस्प्ले असल्याचे म्हटले जाते.
Photo Credit: Oppo
ओप्पोचा पुढील फोल्डेबल फ्लॅगशिप फोन, फाइंड एन६, फेब्रुवारी २०२६ मध्ये लाँच होण्याची अफवा आहे.
2025 या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेला Oppo Find N5 हा एक प्रभावी फोल्डेबल होता आणि Galaxy Z Fold 7 च्या सावलीतही 2025 च्या सर्वोत्तम फोनपैकी एक होता. आता Oppo चा पुढील फोल्डेबल फ्लॅगशिप फोन, Find N6, फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच होण्याची चर्चा आहे. लाँचबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, एका नवीन लीकमुळे फोल्डेबल फोनबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. leakster Digital Chat Station नुसार, Find N6 मध्ये दोन 50MP sensors आणि 200MP senso सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, Oppo Find N6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे. प्रायमरी सेन्सरमध्ये दोन 50MP कॅमेरे आणि एक 200MP मेन सेन्सर असल्याचे वृत्त आहे. याव्यतिरिक्त, फोल्डेबलमध्ये रंग अचूकता, व्हाईट बॅलन्स आणि एकूण फोटो क्वॅलिटी सुधारण्यासाठी 2MP मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर समाविष्ट असू शकतो. यात 6,000mAh बॅटरी, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज आणि सुमारे 225 ग्रॅम वजन असण्याची शक्यता आहे.
यात Snapdragon 8 Elite Gen 5 SoC असण्याची अपेक्षा आहे. Oppo Find N6 हा स्मार्टफोन गडद काळा, सोनेरी नारंगी आणि मूळ टायटॅनियम अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असू शकतो. Find N6 मध्ये 2K resolution सह 8.12 इंचाचा अंतर्गत फोल्डेबल LTPO screen आणि 6.62 इंचाचा कव्हर डिस्प्ले असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान अशाही चर्चा आहेत की Oppo Beidou satellite communication support सह एक आवृत्ती सादर करेल, जे सुधारित नेव्हिगेशन क्षमतांची आवश्यकता असलेल्या यूजर्सना सेवा देईल. फोल्डेबल फोनमध्ये 2,700mAh आणि 3,150mAh अशा दोन बॅटरी युनिट्स असण्याची शक्यता आहे. एकत्रितपणे, ते एकूण 5,850mAh क्षमता देऊ शकतात, जी Oppo मार्केटिंगच्या उद्देशाने 6,000mAh पर्यंत वाढवू शकते. या सेटअपचा उद्देश फोल्डेबल डिझाइनसह पॉवर गरजा संतुलित करणे आहे.
Oppo ने अधिकृत लाँच तारीख जाहीर केलेली नसली तरी, सुरू असलेल्या चर्चा आणि अफवांवरून Find N6 जानेवारी 2026 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे मागील अहवालांशी जुळते, ज्यात 2026 च्या पहिल्या तिमाहीमाध्ये म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान रिलीज विंडो दाखवण्यात आली होती.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Redmi Turbo 5, Redmi Turbo 5 Pro to Be Equipped With Upcoming MediaTek Dimensity Chips, Tipster Claims