Lava Agni 3 च्या तुलनेत Agni 4 हा फोन किंमतीला थोडा जास्त असण्याचा अंदाज आहे. 25 हजारांच्या आसपास फोनची किंमत असू शकते.
Photo Credit: Lava
लावा अग्नि ४ ला लावा अग्नि ३ ची जागा घेण्याची शक्यता आहे (चित्रात)
Lava कंपनी कडून त्यांना नवा स्मार्टफोन Agni 4 लवकरच भारतीय बाजरात लॉन्च करणार आहेत. हे मॉडेल देखील लावा च्या ऑक्टोबर 2024 मध्ये आलेल्या Lava Agni 3 प्रमाणेच असणार असल्याची माहिती मिळाली आहे. Agni 4 लॉन्च पूर्वीच चर्चेत आहे. या फोन बद्दलचे काही अपडेट्स समोर आले आहेत. त्यामध्ये फोनचं डिझाईन, स्पेसिफिकेशन, किंमत यांची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे. समोर आलेल्या लीक्स नुसार, Agni 4 मध्ये MediaTek Dimensity 8350 SoC असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग कसा असू शकतो हा Lava Agni 4 हे नक्की जाणून घ्या.
Lava Agni 3 मध्ये Dimensity 7300X chip चा समावेश होता पण आता Agni 4 मध्ये MediaTek Dimensity 8350 processor असण्याचा अंदाज आहे. Agni 4 फोनचा डिस्प्ले हा 6.78-inch full-HD+ display आणि 120Hz refresh rate सह आहे. या फोनमध्ये 50MP rear cameras हे pill-shaped camera module आणि LED flash सह असणार आहेत.
tipster Yogesh Brar,च्या माहितीनुसार Lava Agni 4 मध्ये मेटल फ्रेम आणि फोनची मागील बाजू पांढर्या रंगाची असण्याचा अंदाज आहे. या फोन मध्ये flat edges असू शकतात. पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे उजव्या बाजूला असू शकतात. विशेष म्हणजे, Agni 3 च्या मागील बाजूस असलेला मिनी AMOLED डिस्प्ले नवीन डिझाइनमध्ये नसेल, जो डिव्हाइसच्या फीचर्स मध्ये बदल झाल्याचे सांगतो.
यूजर्सना लवकर डेटा ट्रान्सफर देण्यासाठी डिव्हाइसमध्ये UFS 4.0 स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. यात मोठी 7,000mAh बॅटरी देखील असू शकते, जी पुन्हा पुन्हा चार्जिंगशिवाय फार काळ वापरता येऊ शकते.
91Mobiles च्या रिपोर्ट्सनुसार, Agni 4 ची भारतामधील किंमत 25 हजारांच्या आसपास असू शकते. Lava Agni 3 च्या तुलनेत आता या नव्या मॉडेलची किंमत जास्त आहे. Lava Agni 3 चं बेस मॉडेल (8GB RAM and 128GB storage) 20,999 पासून सुरू होते. 256GB Agni 3 variant चार्जर सकट 24,999 मध्ये मिळत होता. पण आता फोनच्या प्रोसेसर मध्ये अपग्रेड झाल्याने आणि अन्य फीचर्स मुळे किंमतही वाढली आहे.
लावा ने अद्याप Agni 4 ची किंमत, लॉन्च डेट यांची माहिती दिलेली नाही. कंपनीने आगामी स्मार्टफोनच्या वितरण चॅनेलचीही पुष्टी केलेली नाही. Lava Agni 4 मध्ये रस असलेल्या ग्राहकांना तपशीलवार माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत निवेदनाची वाट पहावी लागणार आहे.
जाहिरात
जाहिरात