OnePlus घेऊन येत आहे फ्री AI, तेसुद्धा OnePlus Nord 4 सोबत

OnePlus घेऊन येत आहे फ्री AI, तेसुद्धा OnePlus Nord 4 सोबत

Photo Credit: Android Headlines

महत्वाचे मुद्दे
  • 2 ऑगस्ट पासून OnePlus Nord 4 खरेदी करण्यासाठी उपलब्ध.
  • OnePlus Nord 4 चा मागील कॅमेरा OIS आणि EIS तंत्रज्ञानासह बनवण्यात आला आ
  • OnePlus Nord 4 256 GB ह्या स्मार्टफोनवर मिळणार 1000 रुपयांची सूट.
जाहिरात
16 जुलै 2024 रोजी इटलीतील मिलान शहरामध्ये OnePlus कडून आयोजित करण्यात आलेल्या समर लॉन्च ह्या कार्यक्रमात OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोन ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे त्यातील AI वैशिष्ट्यांमुळे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची बरीचशी कामे कोणत्याही लॅपटॉपच्या मदतीशिवाय फक्त मोबाईलवर करू शकता. चला तर मग बघुयात नुकत्याच लॉन्च झालेल्या ह्या स्मार्टफोन बद्दल सर्वकाही. 

OnePlus Nord 4 ची किंमत, रंग आणि प्रकार.

जर तुम्हाला देखील OnePlus Nord 4 विकत घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन ऑब्सिडियन मिडनाइट, मर्क्युरियल सिल्व्हर आणि ओएसिस ग्रीन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ह्या स्मार्टफोन चे तीन प्रकार आणि त्यांची किंमत खालीलप्रमाणे आहे :

1. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे, 29,999 रुपये.

 2. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे, 32,999 रुपये.

3. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे, 35,999 रुपये.

OnePlus Nord 4 ची उपलब्धता आणि ऑफर्स.

OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन जरी 16 जुलैला लॉन्च झाला असला तरी, भारतात तो विकत घेण्यासाठी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट 2024 पासून OnePlus ची अधिकृत वेबसाइट, OnePlus चे ॲप्लिकेशन, OnePlus चे स्टोअर्स, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइटस, क्रोमा आणि विजय सेल्स सारख्या रिटेल आऊटलेटवर देखील उपलब्ध होणार आहे. 

प्रास्ताविक ग्राहकांना ICICI बँक आणि OneCard च्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांची सूट देण्यात येईल. OnePlus Nord 4 256 GB, हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आधीच बुकिंग किंवा ऑर्डर केल्यावर 1000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. 

OnePlus Nord 4 ची वैशिष्ट्ये.

OnePlus Nord 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला, 1.5K AMOLED, 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, मागील कॅमेरा OIS आणि EIS तंत्रज्ञनासह 50 मेगापिक्सलचा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असा कॅमेरा सेट अप आहे. 

OnePlus Nord 4 ची बॅटरी 5500 mAh ची असून 100 वॅट च्या अतिजलद चार्जिंगचे सुद्धा समर्थन करते. त्याशिवाय OnePlus कंपनी चार वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि सहा वर्षाचे संरक्षण पॅच सुद्धा देणार आहे. 

OnePlus Nord 4 हा पूर्णपणे ॲल्युमिनियम पासून बनवलेला असून Qualcomm Snapdragon 7 Plus Gen 3 SoC द्वारे समर्थित आहे. 

ह्या स्मार्टफोनचे महत्वपर्ण वैशिष्टये म्हणजे AI तंत्रज्ञान. ज्याच्या मदतीने तुम्ही फोटोसंदर्भातील असंख्य बदल तुमच्या स्मार्टफोन मध्येच करू शकता. सोबतच AI लेखन, AI सारांश, AI बोल अशी अनेक वैशिष्ट्ये ह्या स्मार्टफोन मध्ये वर्ष अखेरीस update करण्यात येतील अशी माहिती OnePlus ने आपल्या अधिकृत वेबसाइट वर दिली आहे.

 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »