सध्याच्या आधुनिक युगात AI प्रणाली ही एक अशी गोष्ट बनली आहे, की याशिवाय तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे अपुरेच वाटते. AI लॉन्च झाल्यापासून त्याच्या फायद्यांमुळे हल्लीच्या नवनवीन लॅपटॉप, स्मार्टफोन्स अशा प्रत्येक उपकरणात त्याचा वापर वाढत चालला आहे. अलीकडेच OnePlus ने आपल्या OnePlus Nord 4 या मालिकेमधील स्मार्टफोन्स मध्ये AI वैशिष्ट्ये आणली आहेत, जी AI टूलकिट द्वारे या स्मार्टफोन्स मध्ये उपलब्ध असणार आहेत. चला तर मग बघुयात OnePlus च्या या टूलकिटमध्ये कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.
OnePlus Nord 4 सिरीजची AI वैशिष्ट्ये.
OnePlus Nord 4 सिरीजचे पहिले AI वैशिष्ट्य म्हणजे AI Speak. या वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही कोणताही मजकूर किंवा लेख स्वतःहून न वाचता AI मदतीने वाचून घेऊ शकता. याचाच अर्थ की तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल पण वाचन करण्याकरिता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही AI Speak ची मदत घेऊ शकता जे तुम्हाला हा मजकूर वाचून यातील महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे काम करेल. यामध्ये तुम्ही स्त्री किंवा पुरुष अशा दोन आवाजांचे पर्याय निवडू शकता. त्यासोबतच तुम्हाला वाचनाची गती ठरवण्याचा पर्याय देखील देण्यात येतो. याव्यतिरिक्त वाक्य वगळण्याचे किंवा एक वाक्य पुढे जाण्याचे पर्याय देखील यामध्ये जोडण्यात आले आहेत.
OnePlus Nord 4 सिरीजचे दुसरे AI वैशिष्ट्य म्हणजे AI Summary. Summary म्हणजेच सारांश, एक असा लहान लेख जो तुम्हाला बऱ्याचशा पानांची माहिती अगदी थोडक्यात आणि कमी परिच्छेदांमध्ये दिला जातो. तुम्ही असे समजू शकता की तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल बऱ्याचशा कागदपत्रांमध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि तिचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे कमी वेळ आहे, अशावेळी तुम्ही AI Summary चा वापर करून या कागदपत्रांना छोट्या सारांशामध्ये बदलू शकता जे मुद्देसूद आणि माहितीपूर्ण असेल. त्यामुळे तुम्हाला अचूक माहिती सोबत अभ्यास किंवा काम करण्याचा वेळ वाचविण्यास मदत होते.
OnePlus Nord 4 सिरीजचे तीसरे AI वैशिष्ट्य म्हणजे AI Writer. जर तुम्ही लेखन किंवा कथा या क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुमच्यासाठी हे वैशिष्ट्य फार महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही विषयाचा निबंध, मजकूर, लेख किंवा अगदी एखादा ई-मेल सुद्धा तुम्ही AI Writer च्या मदतीने लिहू शकता. हे वैशिष्ट्य फक्त तुमचा टायपिंग करण्याचा वेळ वाचवत नाही, तर कोणत्याही विषयावर सखोल माहिती शोधण्या सोबतच ते मुद्देसूद पद्धतीने मांडण्याचे काम करते. ज्याच्यासाठी AI Writer ला फक्त काही मिनिटांचा अवधी लागतो. OnePlus Nord 4 सिरीजची AI वैशिष्ट्ये कशी वापरायची?
OnePlus Nord 4 सिरीजची AI वैशिष्ट्ये वापरण्यासाठी सर्वप्रथम स्क्रीन रेकोगनिशन सक्षम करणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला Settings मध्ये जाऊन Accessibility & Convenience या पर्यायामध्ये जाऊन ते सक्षम करावे लागेल.