OnePlus Pad Go 2 ची भारतात एंट्री; 12.1-इंच डिस्प्ले, 10,050mAh बॅटरी

OnePlus Pad Go 2 च्या Wi-Fi variant ची किंमत 128GB मॉडेलसाठी 26,999 रुपये आणि 256GB मॉडेलसाठी 29,999 रुपये आहे.

OnePlus Pad Go 2 ची भारतात एंट्री; 12.1-इंच डिस्प्ले, 10,050mAh बॅटरी

नवीन OnePlus Pad Go 2 स्वतंत्र विकल्या जाणाऱ्या Stylo स्टायलस इनपुटला सपोर्ट करतो

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus Pad Go 2 टॅबलेटमध्ये MediaTek Dimensity 7300-Ultra चिपसेट समाविष्
  • OnePlus Pad Go 2 मध्ये 10,050mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • टॅब्लेटमध्ये 8MP चा मागील कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा
जाहिरात

OnePlus 15R सोबत कंपनीने नवा नेक्स्ट जनरेशन टॅबलेट देखील लॉन्च केला आहे. OnePlus Pad Go 2,हा टॅबलेट दमदार स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. यामध्ये डिस्प्लेला अपग्रेडस देण्यात आला आहे. परफॉर्ममन्स, बॅटरी आणि कॅमेरा देखील उत्तम आहे. हा टॅबलेट Stylusला सपोर्ट करतो. OnePlus Pad Go 2 च्या किंमती, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धतेबद्दलचे पहा हे अपडेट्स.OnePlus Pad Go चे स्पेसिफिकेशन्स,OnePlus Pad Go मध्ये 12.1-inch LCD display असून 7:5 aspect ratio आणि 120Hz refresh rate आहे. त्यामध्ये 900 nits peak brightness आहे. 12-bit colour depth आणि 98% DCI-P3 colour gamut coverage आहे. या टॅबलेट मध्ये MediaTek Dimensity 7300-Ultra चीपसेटचा समावेश आहे. ती 8GB of LPDDR5X RAM आणि 128GB or 256GB using UFS 3.1 सह आहे.

OnePlus Pad Go 2 मध्ये 10,050mAh बॅटरीचा समावेश असून 33W fast charging चा सपोर्ट आहे. सोबत USB Type-C port आहे. हा OxygenOS 16 वर चालतो. टॅब्लेटमध्ये 8MP चा मागील कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. ऑडिओ आउटपुटसाठी क्वाड स्पीकर्स, मल्टीपल ऑडिओ कोडेक्ससह ब्लूटूथ 5.4 साठी समर्थन, वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी आणि शॅडो ब्लॅक व्हेरिएंटमध्ये पर्यायी 5G सेल्युलर सपोर्ट यांचा समावेश आहे. शॅडो ब्लॅक आणि लव्हेंडर ड्रिफ्ट रंगांमध्ये हा टॅबलेट उपलब्ध असणार आहे. या टॅबलेटमध्ये चार स्पीकर्स आहेत. हे एआय रायटर, एआय रेकॉर्डर आणि एआय रिफ्लेक्शन इरेजर सारख्या एआय-आधारित सॉफ्टवेअर फीचर्सचा सपोर्ट करते.

OnePlus Pad Go 2 ची किंमत

OnePlus Pad Go 2 च्या Wi-Fi variant ची किंमत 128GB मॉडेलसाठी 26,999 रुपये आणि 256GB मॉडेलसाठी 29,999 रुपये आहे, तर 5G variant ची किंमत 32,999 रुपये आहे. हा टॅबलेट वनप्लस ई-स्टोअर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि रिटेल चॅनेलवर उपलब्ध असेल. 26 डिसेंबरपासून त्याची विक्री सुरू होईल.

सुरुवातीची ऑफर म्हणून, OnePlus ग्राहकांना 2000 रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 1000 रुपयांची मर्यादित काळाची सूट देत आहे. यामुळे सुरुवातीची किंमत 23,999 रुपयांपर्यंत कमी होईल. नवीन OnePlus Pad Go 2 नवीन स्टायलस, OnePlus Pad Go 2 Stylo द्वारे इनपुटला सपोर्ट करतो, जो स्वतंत्रपणे विकला जातो. हे 4,096 levels of pressure sensitivity आणि Bluetooth 5.4 कनेक्टिव्हिटी देते.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »