pre-order page वरील माहितीनुसार, Oppo Pad Air 5 हा Wi-Fi-only आणि Wi-Fi + 5G versions मध्ये उपलब्ध असणार आहे.
Photo Credit: Oppo
Oppo Pad Air 5 हा OnePlus Pad Go 2 चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो
Oppo कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओप्पो आता बाजरात नवा टॅबलेट Oppo Pad Air 5 हा 25 डिसेंबर दिवशी आणणार आहेत. हा टॅबलेट चीन मध्ये लॉन्च होणार आहे. सध्या Oppo Shop वर त्याचे प्री ऑर्डर पेज लाईव्ह करण्यात आले आहे. यामधून टॅबलेटच्या डिझाईन, की स्पेसिफिकेशन्स आणि व्हेरिएंट्सची अधिकृत घोषणेपूर्वीच माहिती मिळाली आहे.
Oppo Pad Air 5 मध्ये 2.8K resolution display असून तो ColorOS वर चालतो. त्यामध्ये 10,050mAh बॅटरी आहे. pre-order page वरील माहितीनुसार, Oppo Pad Air 5 हा Wi-Fi-only आणि Wi-Fi + 5G versions मध्ये उपलब्ध असणार आहे. तर हा टॅबलेट Space Gray, Starlight Powder, आणि Starlight Pink मध्ये उपलब्ध असेल.
Wi-Fi edition मधील टॅबलेट 8GB + 128GB, 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB कॉन्फ्युगरेशन मध्ये उपलब्ध असेल तर 5G version मधील टॅबलेट हा Space Gray रंगात उपलब्ध असून तो 8GB + 128GB configuration मध्ये असणार आहे.
Oppo Pad Air 5 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा टॅबलेट OnePlus Pad Go 2 चा रिब्रॅन्डेड व्हर्जेन असू शकतो जो नुकताच बाजरात आला आहे. OnePlus Pad Go 2 हा या आठवड्याच्या सुरुवातीला भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आला. त्यामुळे Pad Air 5 मध्ये 12.1-inch LCD 2.8K 120Hz display,Dimensity 7300-Ultra chipset, LPDDR4x RAM, UFS 3.1 storage,आणि 10,050mAh बॅटरी सह 33W charging सपोर्ट मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये पुढील आणि मागील बाजूस 8 मेगापिक्सेल कॅमेरे असू शकतात. ऑडिओसाठी, त्यात क्वाड-स्पीकर सेटअप आणि biometric authentication साठी फेस अनलॉक समाविष्ट असू शकते. OnePlus मध्ये OnePlus Pad Go 2 Stylo स्टायलस देखील आहे, जो टॅबलेटसाठी पर्यायी अॅक्सेसरी म्हणून स्वतंत्रपणे विकला जात आहे.
Oppo Pad Air 5 हा 2023 मध्ये लाँच झालेल्या Oppo Pad Air 2 चा उत्तराधिकारी असेल. Oppo Pad Air 2 चीनबाहेरील बाजारपेठेत लाँच झालेल्या OnePlus Pad Go चा रिब्रॅन्डेड व्हर्जेन होता. सध्या तरी, जागतिक बाजारपेठेत OPPO Pad Air5 कधी येणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
जाहिरात
जाहिरात