Photo Credit: Google Play
Bharti Airtel ने streaming platform Zee5 सोबत भागीदारी केल्याची माहिती दिली आहे. आता भारतामधील सार्या Airtel Wi-Fi plans (Rs. 699 पासून पुढे) च्या ग्राहकांना Zee5 वरील शोज, सिनेमे मोफत पाहता येणार आहेत. OTT प्लॅटफॉर्म वरील सुमारे 1.5 लाख तासांहून अधिकचा कॉन्टेट ऑफर करण्याचा दावा त्यांनी केला आहे. या ऑफरचा फायदा 699 रूपयांचा प्लॅन सोबतच 899 रूपये, 1099 रूपये, 1599 रूपये आणि 3999 रूपयांच्या WiFi प्लान्स सोबतच्या ग्राहकांनाही मिळणार आहे.
दरम्यान सब्सस्क्रायबर्सना 699 आणि 899 रूपयांच्या प्लान्सच्या रिचार्ज सोबत Disney+ Hotstar चा देखील अॅक्सेस दिला जात आहे. यासोबत 1099 किंमतीच्या प्लान सोबत Amazon Prime चा अॅक्सेस दिला जात आहे. याप्रमाणे 1599 आणि 3999 च्या प्लान च्या रिचार्ज सोबत कंपनीकडून नेटफ्लिक्सचा देखील मोफत अॅक्सेस देत आहेत. या सार्या प्लॅन्स सोबत Airtel Xstream मिळते. 20 पेक्षा जास्त ओटीटी सेवांचा कंटेट पहायला मिळणार आहे.
विविध OTT सेवांच्या अॅक्सेस सोबत , एअरटेलच्या वायफाय प्लॅनसह रिचार्जिंग देखील वेगवेगळ्या इंटरनेट स्पीडचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. 40Mbps ते 1Gbps पर्यंत आणि त्यांना 350 पेक्षा जास्त HD आणि SD टीव्ही चॅनेल पाहण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवर किंवा एअरटेल इंडियाच्या वेबसाइटवर एअरटेल थँक्स ॲपवरून योजनांचा लाभ घेऊ शकतात.
टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Zee5 सह या भागीदारीमुळे, एअरटेल ब्रॉडबँड ग्राहकांना सॅम बहादूर, RRR, सिर्फ एक बंदा काफी है, मनोरथंगल, विकटकवी आणि इतर सारख्या लोकप्रिय चित्रपटांचा आनंद घेऊ शकतात. विनामूल्य अॅक्सेस मुळे युजर्सना प्लॅटफॉर्मवर सर्व मूळ शोज, ओटीटी चित्रपट, टीव्ही मालिका आणि इतर सर्व कंटेट पाहण्याची परवानगी मिळणार आहे.
या भागीदारीमुळे एअरटेलच्या सध्याच्या वाय-फाय + टीव्ही सेवांना अधिक बळकटी मिळणार आहे. जे आधीच 350 हून अधिक HD चॅनेल्सची सेवा देत आहे. Airtel ग्राहकांना Airtel Xstream Play वर देखील अॅक्सेस देणार आहे, जे SonyLiv, ErosNow, SunNxt आणि AHA सह 23 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट देत आहे.
जाहिरात
जाहिरात