Photo Credit: Alcatel
अल्काटेल व्ही३ प्रो ५जी काळ्या आणि हिरव्या रंगात येण्याची शक्यता आहे
Alcatel V3 5G सीरीज भारतामध्ये 27 मे दिवशी लॉन्च होणार आहे. Alcatel V3 Ultra 5G model बाजारात येणार असल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे. फ्रेंच मोबाईल ब्रॅन्ड जो TCL Communication, कडून ऑपरेट केले जातो. आता या फोन मध्ये Alcatel V3 Pro 5G आणि V3 Classic 5G ची झलक समोर आली आहे. फोन लॉन्च होण्या पूर्वी त्याचे डिझाईन, रंग आणि महत्त्वाचे फीचर्स याची माहिती समोर आली आहे. Flipkart च्या माध्यमातून तो खरेदी करता येणार आहे.Alcatel V3 Pro 5G, V3 Classic 5G ची झलक समोर,Alcatel V3 Pro 5G हा स्मार्टफोन काळा आणि हिरवा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Flipkart app वरील मायक्रोसाईट मध्ये त्याची माहिती देण्यात आली आहे. या हॅन्डसेट मध्ये 6.7-inch display आणि 120Hz refresh rate आणि TCL's proprietary NXTPAPER technology आहे. हे रेग्युलर, इंक पेपर, मॅक्स इंक आणि कलर पेपर मोड्सना सपोर्ट करेल.
Alcatel ने कंफर्म केलेल्या माहितीनुसार, V3 Classic 5G चा डिस्प्ले eye care features ला सपोर्ट करतो. त्यामध्ये low blue light आणि anti-glare फीचर असेल. यासोबतच adaptive colour temperature आणि ब्राईटनेस, नाईट लाईट मोड चा पर्याय असणार आहे.
Alcatel V3 Classic 5G हा पांढऱ्या रंगात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या हँडसेटमध्ये 120Hz refresh rate सह NXTPAPER डिस्प्ले असेल. या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC आणि 18W charging सह 5,200mAh battery असेल. फोनमधील कॅमेरा पाहता यात 50-megapixel primary rear camera आणि 8-megapixel selfie shooter असेल. दोन्ही फोन चार्जर आणि बॉक्समध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हरसह येतील.
Alcatel V3 Ultra 5G हा फोन Champagne Gold, Hyper Blue, आणि Ocean Grey रंगात असेल. Ultra version हा NXTPAPER display सह येणार आहे. 6.8-inch full-HD+ स्क्रीन, आणि Max Ink mode मध्ये, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर सात दिवसांपर्यंत चालेल असा दावा केला जातो.
फोनमधील कॅमेरा पाहता Alcatel V3 Ultra 5G मध्ये 108-megapixel primary rear sensor, 8-megapixel आणि 2-megapixel सेन्सर आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज असेल. यात 5,010mAh battery असेल जी 33W fast charging supportसह असेल. फोनमध्ये DTS X Sound सह dual speakers आणि physical SIM सह असल्याची पुष्टी झाली आहे.
जाहिरात
जाहिरात