Photo Credit: X/Madhav Sheth
Alcatel V3 Ultra भारतात लॉन्च साठी सज्ज; Alcatel 3 वर्षांनंतर देशात लॉन्च करतोय नवा फोन
Alcatel भारतीय स्मार्टफोन्सच्या बाजारात पुन्हा प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. Alcatel V3 Ultra हा भारतामध्ये लॉन्च होणार आहे. तब्बल 3 वर्षांनंतर भारतामध्ये Alcatel त्यांचा नवा स्मार्टफोन घेऊन येत आहे. HTech च्या Madhav Sheth,यांनी डिव्हाईसचं नाव आणि डिझाईनची पुष्टी केली आहे. सोशल मीडियावर रिटेल बॉक्सचा फोटो शेअर करून डिझाइनची माहिती दिली आहे. त्यात ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असल्याचे दिसते. रिटेल बॉक्समध्ये Alcatel V3 Ultra मध्ये स्टायलस असल्याचे देखील दिसून येते.Alcatel V3 Ultra च्या नावाची पुष्टी,Alcatel India चे संस्थापक आणि tech advisor माधव शेठ यांनी X वर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये unannounced Alcatel V3 Ultra चे रिटेल बॉक्स दाखवले आहेत. रिटेल बॉक्स काळ्या रंगात दाखवला आहे आणि त्याचे नाव पिवळ्या रंगात छापलेले आहे. बॉक्सवर आपल्याला स्टायलसची प्रतिमा दिसते. हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट दाखवण्यात आला आहे. कॅमेरा सेन्सर्स एलईडी फ्लॅशसह एका गोलाकार आयलॅन्ड वर आहे. या फोटोमध्ये उजवीकडे Alcatel V3 Ultra चा निळा रिटेल बॉक्स आहे. त्यावरून असे दिसून येते की फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले असेल आणि समोरील कॅमेऱ्यासाठी मध्यभागी होल पंच कटआउट असेल.
Alcatel V3 Ultra बद्दलची बरीच माहिती, त्याची अचूक लाँच तारीख आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन, अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, असे दिसते की हा फोन भारतात एक्सक्लुझिव्हरित्या रिलीज होऊ शकतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात Alcatel ने भारतीय बाजारपेठेत परतण्याची पुष्टी केली. TCL कम्युनिकेशनद्वारे स्वतंत्रपणे चालवले जाणारे हे ब्रँड देशात प्रीमियम स्मार्टफोन्सची रेंज जाहीर करण्याच्या तयारीत आहे.
अल्काटेल स्मार्टफोन्सची विक्री फ्लिपकार्टच्या मुख्य प्लॅटफॉर्म आणि त्याच्या क्विक डिलेव्हरी सर्व्हिस, Flipkart Minutes द्वारे केली जाईल. ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या वेबसाइटवर एका लँडिंग पेजद्वारे नवीन हँडसेटच्या आगमनाची माहिती देत आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगवरून असे दिसून येते की Alcatel V3 Ultra मध्ये टीसीएलचा मालकीचा NXTPAPER डिस्प्ले असेल.
Alcatel ने आधीच जाहीर केले आहे की त्यांचे स्मार्टफोन्स स्थानिक पातळीवर देशातच तयार केले जातील, जे सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत असतील. customer support साठी ते संपूर्ण भारतात सेवा नेटवर्क निर्माण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात