iPhone 15 हा 2023 मध्ये लॉन्च झाला आहे. त्याची किंमत सुमारे 79,900 होती. सध्या हा फोन अमेझॉन वर 59,990 रूपयात मिळणार आहे.
आयफोन १५ २०२३ मध्ये भारतात लाँच झाला होता
Amazon Great Indian Festival Sale 2025 यावर्षी 23 सप्टेंबर पासून भारतभर सुरू होत आहे. तर प्राइम मेंबर्सना हा सेल एक दिवस आधीपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन, या वर्षातील सर्वात मोठ्या सेल इव्हेंटमध्ये विविध उत्पादनांवर आकर्षक डील सादर केल्या जातात. जर तुमच्या मनात स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार असेल, तर अमेझॉन सेल हा त्यासाठी एक उत्तम मार्ग असू शकतो. किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त, ग्राहकांना बँक ऑफर्स, कूपन-आधारित डील आणि नो-कॉस्ट ईएमआय ऑफरसह अतिरिक्त बचत देखील अनलॉक करू शकतात. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या आधी, अमेझॉनने टॉप स्मार्टफोन्सवर अनेक डीलची घोषणा केली आहे जी लाईव्ह असतील.
iPhone 15 वर अमेझॉनच्या सेलमध्ये असलेल्या ऑफरच्या आधारे तो स्वस्तात खरेदीचा पर्याय आहे. Amazon Great Indian Festival Sale 2025 दरम्यान 45,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 15 खरेदी करता येणार आहे.
iPhone 15 हा 2023 मध्ये लॉन्च झाला आहे. त्याची किंमत सुमारे 79,900 होती. सध्या हा फोन अमेझॉन वर 59,990 रूपयात मिळणार आहे. हँडसेटच्या किमतीत अमेझॉन कपात करेल, ज्यामुळे त्याची किंमत त्याच्या नेहमीच्या बाजारभावापेक्षा बरीच कमी होईल.
किंमतीतील कपातीसोबतच, ग्राहकांना SBI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफर्स एकत्रित केल्यावर, Amazon Great Indian Festival Sale 2025 दरम्यान iPhone 15 केवळ 43,749 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
ग्राहकांना एक्स्चेंज डील्समधूनही अधिक बचत करण्याची संधी मिळेल. मात्र, लक्षात ठेवा की अंतिम सूट रक्कम तुमच्या जुन्या मोबाईलच्या मॉडेल, त्याची स्थिती आणि तुमच्या लोकेशननुसार बदलू शकते.
iPhone 15 ची पूर्ण किंमत आगाऊ देऊ इच्छित नसलेल्या ग्राहकांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील आहेत. काही महिन्यांत हा ईएमआय वाटला गेल्याने अतिरिक्त शुल्क न भरता त्याचाही फायदा घेतला जाऊ शकतो.
iPhone 15 हा अॅपलचा नवीन रिलीज फोन नाही पण तो खास आहे. या फोनमध्ये A16 बायोनिक चिप, डायनॅमिक आयलंड डिस्प्ले, 48MP ड्युअल-कॅमेरा सेटअप आणि USB-C पोर्ट आहे. 45,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत, तो मध्यम श्रेणीच्या अँड्रॉइड फोनशी स्पर्धा करताना फ्लॅगशिप-ग्रेड परफॉर्मन्स देतो.
जाहिरात
जाहिरात