Photo Credit: iQOO
अमेझॉनचा आगामी प्राइम डे २०२५ सेल १२ जुलै ते १४ जुलै पर्यंत चालेल
Amazon Prime Day 2025 हा 12 जुलै ते 14 जुलै दरम्यान होणार आहे. या सेल मध्ये भारतीय प्राईम मेंबर्स साठी iQOO ने धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. iQOO या स्मार्टफोन ब्रॅन्ड कडून 3 दिवसांच्या शॉपिंग इव्हेंट मध्ये त्यांचे काही फोन सवलतीच्या दरात विक्रीसाठीसाठी उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जे त्यांचे स्मार्टफोन अपग्रेड करण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा अमेझॉन प्राईम डे सेल एक उत्तम संधी असणार आहे. iQOO Smartphones च्या कोणत्या फोन वर किती सूट असणार आहे? हे नक्की जाणून घ्या.
iQOO Smartphones च्या iQOO Z10 Lite, Z10x, Z10, Neo 10R, Neo 10, आणि फ्लॅगशीप iQOO 13 या स्मार्टफोन वर सूट असणार आहे. हे स्मार्टफोन साधारण 9499 ते 52,999 रूपयांमधील आहेत. काही फोन खरेदी करताना नो कॉस्ट ईएमआय चा देखील पर्याय मिळणार आहे. यासाठी तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीचा पर्याय ग्राहकांना दिला जाणार आहे.
iQOO Z10 Lite हा स्मार्टफोन ₹9,499 या किंमतीमध्ये उपलब्ध असेल तर iQOO Z10x ची किंमत ₹12,749 असेल. iQOO Z10 ची किंमत ₹19,999 असेल, iQOO Neo 10R हा ₹23,499 मध्ये खरेदी करता येईल. iQOO Neo 10 ची किंमत ₹29,999 आणि iQOO 13 ची किंमत ₹52,999 असणार आहे. यामध्ये iQOO Z10, iQOO Neo 10R,iQOO Neo 10 आणि iQOO 13 हे स्मार्टफोन तीन आणि सहा महिन्यांच्या ईएमआय पर्यायांमध्ये विकत घेता येणार आहे.
दरम्यान ही खास ऑफर केवळ प्राईम डे इव्हेंट दरम्यान भारतातील Amazon Prime members साठी असणार आहे. त्यामुळे प्रिमियम स्मार्टफोन सवलतीच्या दरात घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.
या सेल मधील आकर्षण म्हणजे सध्याचा कंपनीचा फ्लॅगशीप मॉडेल, iQOO 13 आहे. या . फोनचे 12GB + 256GB आणि 16GB + 512GB व्हेरिएंट आहेत. जे Legend आणि Nardo Grey या रंगांमध्ये उपलब्ध असतील. या फोनमध्ये 6.82-inch 144Hz 2K LTPO AMOLED display आहे.
जाहिरात
जाहिरात