iPhone 17 Pro आणि Pro Max या मॉडेल्समध्ये नवीन vapor chamber system मुळे उष्णता नियंत्रण अधिक सुधारले जाईल अशीही चर्चा आहे.
अॅपलने गेल्या वर्षी एक नवीन ग्राफीन थर्मल मॅनेजमेंट सिस्टम सादर केली
Apple चा बहुप्रतिक्षित ‘Awe Dropping' इव्हेंट आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आगामी दोन दिवसांतच त्याची प्रतिक्षा संपणार आहे पण सध्या ऑनलाईन माध्यमामध्ये iPhone 17 series चे काही लिक्स समोर येत आहेत. South Korea मधून समोर येत असलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, iPhone 17 Pro मध्ये 8X ऑप्टिकल झूम मिळू शकतो, जो सध्याच्या 5X सेन्सरपेक्षा मोठी झेप मानली जात आहे. सोबतच, iPhone 17 Pro आणि Pro Max या मॉडेल्समध्ये नवीन vapor chamber system मुळे उष्णता नियंत्रण अधिक सुधारले जाईल अशीही चर्चा आहे.ॲपल आपला पहिला मोठा iPhone डिझाईन बदल पाच वर्षांनंतर सादर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अफवांनुसार येणारा iPhone Air हा कंपनीसाठी एक नवीन डिझाईन दिशा ठरू शकतो, ज्याची प्रेरणा MacBook Air आणि iPad Air यांच्या यशस्वी डिझाईनमधून घेतली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हा स्मार्टफोन फक्त 5.5 मिलिमीटर जाडीचा असू शकतो, ज्यामुळे तो आधीच्या iPhone मॉडेल्सपेक्षा आणि नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy S25 Edge पेक्षाही अधिक पातळ असेल. यात A19 प्रोसेसर, USB-C पोर्ट, ProMotion डिस्प्ले तंत्रज्ञान आणि 6.6-इंच स्क्रीन असे फीचर्स असतील, अशी माहिती समोर येत आहे.
अहवालानुसार, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे मॉडेल्स नव्या व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टिमसह बाजारात येऊ शकतात. ही प्रणाली सामान्यतः CPU आणि GPU मधील उष्णता बाहेर काढण्यासाठी वापरली जाते. यात व्हॅक्यूम-सील केलेला घटक असतो ज्यामध्ये अल्प प्रमाणात द्रव असतो आणि तो पॅसिव्ह हीट स्प्रेडर म्हणून काम करतो. जर ही माहिती खरी ठरली, तर सलग दुसऱ्या वर्षी ॲपल नवीन थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम सादर करणार आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या iPhone 16 Pro मॉडेल्ससोबत कंपनीने ग्राफिन थर्मल सिस्टिम आणली होती, ज्यामुळे उष्णता नियंत्रण सुधारावे आणि ओव्हरहिटिंग टाळता यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
सुधारित थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम अॅपलच्या यूजर्सना अधिक ग्राफिक्स-इंटेन्सिव्ह गेम्स खेळण्याची, जास्त वेळ ProRes व्हिडिओ शूट करण्याची आणि अगदी 8K रिझोल्यूशनमध्ये रेकॉर्डिंग करण्याची संधी देईल. यावेळी त्यांना “Your iPhone needs to cool down” असा इशारा देखील मिळणार नाही.
जाहिरात
जाहिरात