भारतात आयफोन 17 ची किंमत Rs 82,900 पासून सुरू होणार आहे.
Photo Credit: Apple
आयफोन १७ पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे
Apple कडून अखेर iPhone 17 लॉन्च करण्यात आला आहे. अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये ‘Awe Dropping'या इव्हेंट मध्ये या फोनचं लॉन्चिंग झालं आहे. अॅप्पल पार्क मध्ये CEO Tim Cook यांनी 2025 चं आयफोनचं बेस मॉडेल लॉन्च केले आहे. iPhone 17 मध्ये कंपनीने बदल केले आहेत. आवश्यक अपग्रेड्स सह फोन बाजारात आला आहे. iPhone 17 मध्ये काय आहे खास आणि फोनची किंमत याचे सारे अपडेट्स इथे घ्या जाणून!
iPhone 17 ची किंमत 799 डॉलर्स पासून सुरू होते. भारतीय रूपयांमध्ये ती 70,400 आहे. आयफोन 17 चा बेस मॉडेल 256GB variant चा आहे. यामध्ये 512GB model देखील आहे. भारतात त्याची किंमत सुमारे Rs. 82,900 आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना Lavender, Mist Blue, Sage, White, आणि Black रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
प्री-ऑर्डर १२ सप्टेंबरपासून सुरू होतील, तर हे स्मार्टफोन अधिकृतपणे १९ सप्टेंबरपासून जागतिक स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
iPhone 17 मध्ये iOS 26 आधीपासूनच उपलब्ध आहे. अमेरिकेत हे eSIM-ओन्ली तर इतर प्रदेशात Nano + eSIM कॉन्फिगरेशनसह हा फोन उपलब्ध असणार आहे. यात 6.3-इंच Super Retina XDR OLED डिस्प्ले असून ProMotion तंत्रज्ञानासह 120Hz रिफ्रेश रेटची सुविधा मिळते, जी पहिल्यांदाच non-Pro iPhone आणि iPhone Air मध्ये देण्यात आली आहे. 3,000 nits पीक ब्राइटनेस मुळे HDR कंटेंट व बाहेरच्या प्रकाशात डिस्प्ले अधिक स्पष्ट दिसतो. डिस्प्लेला Ceramic Shield 2 प्रोटेक्शन दिले आहे जे स्क्रॅच व क्रॅकपासून जास्त सुरक्षित ठेवते. Always-on Display ची सुविधाही देण्यात आली असून IP68 रेटिंगमुळे फोन पाणी व धुळीपासून सुरक्षित असेल.
अॅपलने आयफोन १७ च्या कॅमेर्यात बदल केला आहे. ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सेल फ्यूजन मेन सेन्सर आहे जो सेन्सर-शिफ्ट OIS सह येतो. समोर, नवीन सेंटर स्टेज सेल्फी कॅमेरा एआय सह आहे.
iPhone 17 मध्ये A19 चिपसेट दिला असून त्यात 16-core Neural Engine आहे, जो AI वर्कलोडसाठी ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे. Apple च्या म्हणण्यानुसार, हा CPU iPhone 16 पेक्षा तब्बल 40% वेगवान परफॉर्मन्स देतो. नव्या आर्किटेक्चरमुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढली आहे, मेमरी बँडविड्थ सुधारली आहे आणि Apple Intelligence साठी अधिक शक्तिशाली AI क्षमता मिळतात.
जाहिरात
जाहिरात