आयफोन १६ प्रो मॅक्स हा कंपनीचा सध्याचा प्रमुख स्मार्टफोन आहे
Apple कडून लवकरच iPhone 17 Pro Max बाजारात येणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा battery-focused flagship आहे. या फोनबद्दल अधिकृत माहिती सप्टेंबर 2025 मध्ये समोर येण्याची शक्यता आहे. फोनबद्दलच्या नव्या लीक्स नुसार, Pro Max modelमध्ये दमदार बॅटरी असणार आहे. ही बॅटरी अंदाजे 5,000mAh क्षमतेची असण्याचा अंदाज आहे. Weibo post च्या माहितीनुसार, Instant Digital, याने दिलेली माहिती पाहता iPhone 17 Pro Max मधील बॅटरी 5,000mAh क्षमतेची असण्याचा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरला तर Apple मध्ये येणारी ही सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी असणार आहे.कोणत्या आयफोन मध्ये किती क्षमतेची बॅटरी?iPhone 14 Pro Max मध्ये बॅटरीची क्षमता 4,323mAh आहे. iPhone 15 Pro Max मध्ये 4,422mAh क्षमतेची बॅटरी आहे. iPhone 16 Pro Max मधील बॅटरी 4,676mAh क्षमतेची आहे आणि आता iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरी 5,000mAh क्षमतेची असण्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.
बॅटरी क्षमतेचा अंदाज खरा धरला तर आयफोन 16 प्रो मॅक्सच्या तुलनेत क्षमतेत जवळजवळ 10% वाढ झाली आहे.
iPhone 17 Pro Max बाबतचे यापूर्वीचे लीक्स पाहता हा फोन आधीच्या आयफोनच्या तुलनेमध्ये थोडा जाड आणि वजनाला अधिक असणार आहे. यावेळेस अॅप्पल कडून स्लिम प्रोफाईल मधील फोन पेक्षा हा फोन थोडा वजनदार करून त्यामधील बॅटरी अधिक जास्त क्षमतेची करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
फोनमध्ये जितकी जास्त क्षमतेची बॅटरी असेल तितका तो फोन जास्त वेळ वापरला जाऊ शकतो. परंतु वास्तविक जगात बॅटरी लाइफ वाढणे iOS 26 मधील सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन, A19 प्रो चिपची कार्यक्षमता आणि डिस्प्ले पॉवर मॅनेजमेंट यावर देखील अवलंबून असेल. तरीही, आयफोन 17 Pro Max अॅपलचा सर्वात जास्त काळ टिकणारा आयफोन म्हणून समोर येईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः अनेक यूजर्स फोन रिचार्ज न करता दिवसभर कामगिरीची मागणी करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
अॅपल दोन महिन्यांत आयफोन 17 सीरीज लाँच करणार असल्याने, अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी, सर्व चिन्हे प्रो मॅक्स मॉडेलकडे निर्देश करतात जे अॅपलने आतापर्यंत दिलेली सर्वोत्तम बॅटरी कामगिरी देत आहे.
जाहिरात
जाहिरात