Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता

रिपोर्ट्सनुसार, iPhone 17 सिरीजमध्ये 4 मॉडेल्स लाँच होण्याचा अंदाज आहे.

Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता

Photo Credit: Apple

कर्सर कुठे निर्देशित करत आहे त्यानुसार इव्हेंटसाठी अॅपल लोगोचा रंग बदलतो

महत्वाचे मुद्दे
  • Apple कडून iPhone 17 launch event हा आज मंगळवार, 9 सप्टेंबर दिवशी होणार
  • iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि नवीन iPhone 17 Air लॉन्च
  • Apple.com, Apple TV app आणि कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर सोहळा पाहता
जाहिरात

Apple प्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे. अ‍ॅप्पल कडून आज आयफोनची नवी सीरीज लॉन्च केली जाणार आहे. यंदाच्या इव्हेंटची टॅगलाईन ‘Awe Dropping'अशी देण्यात आली आहे. अ‍ॅप्पल कडून या इव्हेंट मध्ये नेमकं काय लॉन्च केले जाणार? याची पुसटची कल्पना देण्यात आली आहे पण जाणून आजच्या या ‘Awe Dropping' इव्हेंट मध्ये iPhone 17 लॉन्च सोहळ्यात काय काय होऊ शकतं? भारतात आजचा हा सोहळा कधी, कुठे पाहता येईल?

Apple कडून iPhone 17 launch event हा मंगळवार 9 सप्टेंबर दिवशी होणार आहे. सकाळी 10 च्या सुमारास म्हणजे Pacific Time 10:30PM IST वाजता हा इव्हेंट होणार आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफॉर्नियात Cupertino च्या Apple Park मध्ये हा सोहळा होणार आहे. हा सोहळा लाईव्ह असेल की प्री रेकॉर्डेड हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ज्यांना हा सोहळा लाईव्ह पहायचा आहे ते Apple.com वर तो पाहू शकतील. सोबतच Apple TV app आणि कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर लाईव्हस्ट्रीम केला जाणार आहे. यामध्ये iPhone 17 लॉन्च होणार आहे.

iPhone 17 संदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. लाँच इव्हेंटमध्ये Apple चार नवे iPhone मॉडेल्स आणण्याची शक्यता आहे. बेस iPhone 17 मध्ये फारसे बदल नसून केवळ छोटे हार्डवेअर अपडेट्स असतील. मात्र, Pro मॉडेल्समध्ये मागील बाजूस नवीन डिझाइन आणि Pixel सारखा कॅमेरा बंप दिसू शकतो. दोन्ही Pro मॉडेल्समध्ये कॅमेऱ्याचे मोठे अपडेट्स अपेक्षित आहेत. रिपोर्ट्सनुसार, Apple आपल्या iPhone 17 सिरीजमध्ये चार नवे मॉडेल्स लाँच करण्याची अपेक्षा आहे. यात बेस iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि नवीन iPhone 17 Air चा समावेश आहे. हा स्लिम मॉडेल iPhone 16 Plus ची जागा घेणार असून आतापर्यंतचा सर्वात स्लीम iPhone ठरण्याची शक्यता आहे.

Apple पहिल्यांदाच iPhone 17 चे सर्व चार मॉडेल्स भारतात तयार करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कंपनी चीनवर अवलंबून राहणं कमी करू इच्छित आहे. मागील आर्थिक वर्षात Apple ने भारतातच 9 अब्ज डॉलर्सहून अधिक विक्री केली असून यातील बहुतांश हिस्सा iPhone कडून आला आहे, जो भारताच्या स्मार्टफोन बाजारातील 7 टक्के वाटा आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »