2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम

अधिकाऱ्यांना सहज प्रवास करता यावा यासाठी बेंगळुरू मधील ऑफिस क्यूबन पार्क मेट्रो स्टेशनजवळ आहे.

2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम

Photo Credit: Apple

गुरुवारी सकाळी हेब्बल स्टोअरसाठी बॅरिकेड उघड झाल्याचे अॅपलने सांगितले

महत्वाचे मुद्दे
  • गेल्या वर्षी, अ‍ॅपलने बेंगळुरूमध्ये मोठे कार्यालय सुरू केले
  • Phoenix Mall of Asia, Bengaluru North येथे ॲपलचे पहिले स्टोअर
  • या वर्षी पुणे, दिल्ली-NCR, मुंबईत अ‍ॅपलचे ३ स्टोअर्स येणार
जाहिरात

Apple ने 2023 मध्ये मुंबई मध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दिल्लीत साकेत भागामध्ये त्यांचे रिटेल दुकान उघडले होते. आता 2 सप्टेंबर दिवशी अ‍ॅपल कडून तिसरे रिटेल आऊटलेट बंगळूरू नॉर्थ मध्ये Phoenix Mall of Asia मध्ये उघडणार असल्याची माहिती दिली आहे. Apple Hebbal असणार आहे. "Apple Hebbal मध्ये, ग्राहकांना अॅपलचे सारे प्रोडक्ट लाईनअप पाहता येणार आहे, नव्या फीचर्सचा अनुभव घेता येईल आणि स्पेशालिस्ट, क्रिएटिव्ह, जीनियस आणि dedicated Business teams सारख्या टीम मेंबर्सकडून तज्ञांचा पाठिंबा मिळेल. ग्राहकांना या नवीन स्टोअरमध्ये Today at Apple sessions मध्ये देखील सहभागी होता येईल," असे अॅपलने म्हटले आहे.आज सकाळी Apple Hebbal साठी बॅरिकेडचे अनावरण करण्यात आले. ते भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोरापासून प्रेरित असलेल्या समृद्ध, तेजस्वी पंखांनी सजवलेले आहे. ही कलाकृती Apple च्या भारतातील तिसऱ्या स्टोअरचे सेलिब्रेशन म्हणून समोर आणण्यात आले आहे.

चीन आणि अमेरिका सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये आयफोनच्या प्रवेशाची चिन्हे दिसत असताना, अॅपल जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या भारतात अधिक गुंतवणूक करत आहेत.

गेल्या वर्षी, अॅपलने Minsk Square आणि Cubbon Park जवळ भारतातील त्यांचे सर्वात मोठे कार्यालय उघडले, जे बेंगळुरूमधील सर्वात मोठ्या Green Lung Spaces पैकी एक आहे. यामध्ये 15 मजले आहेत ज्यात खास प्रयोगशाळेची जागा, सहयोग आणि वेलनेससाठी जागा आणि कॅफे मॅक आहेत. येथे 1200 कर्मचारी एकत्र काम करू शकतात. अधिकाऱ्यांना सहज प्रवास करता यावा यासाठी हे ऑफिस क्यूबन पार्क मेट्रो स्टेशनजवळ आहे.

नव्या अ‍ॅप डेव्हलपर्सना सर्व resources मिळविण्यात आणि तज्ञांना प्रत्यक्ष भेटण्यास मदत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये अ‍ॅपल डेव्हलपर सेंटर (पूर्वी App Accelerator म्हणून ओळखले जाणारे) देखील आहे. हे डेव्हलपर्सना त्यांचे applications सुधारण्यास मदत करेल आणि भारतीय सीमेपलीकडे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन देखील मिळवेल.

ताज्या अहवालांनुसार, Apple BKC (मुंबई) आणि Saket (दिल्ली) मध्ये दरमहा 22 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. ते उपखंडातील अन्य ग्राहकांना सेवा देण्यासाठी ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट आणि मोबाइल अॅप देखील चालवत आहेत. अलीकडेच, अॅपलने भारतात 'Shop with a Specialist over Video' ही सेवा सुरू केली आहे. यामुळे यूजर्सना फोन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी अॅपल स्पेशालिस्टशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते. हा वन-वे व्हिडिओ कॉल आहे, कॉलमध्ये फक्त अॅपल व्यक्तीच दिसेल आणि यूजर्सच्या गोपनीयतेसाठी ग्राहकाचा चेहरा लपविला जाईल.

2024 च्या आर्थिक वर्षात, अॅपल इंडियाचा महसूल 36 टक्क्यांनी वाढून 67,122 कोटी रुपये झाला. बेंगळुरू व्यतिरिक्त, अॅपलची या वर्षाच्या अखेरीस पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसह भारतात आणखी तीन ऑफलाईन स्टोअर्स उघडण्याची योजना आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
  2. एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण
  3. Honor Magic V Flip 2 मध्ये 200MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, पहा अन्य स्पेसिफिकेशन्स काय?
  4. 2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम
  5. Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये नवा टेन्सर G5 प्रोसेसर, 8-इंच फोल्डेबल डिस्प्ले
  6. Tensor G5 चिप, AI कॅमेरा टेक्नॉलॉजीसह Google Pixel 10 Series भारतामध्ये लाँच
  7. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  8. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  9. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  10. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »