Asus ROG Phone 9 मध्ये नेमकी फिचर्स, स्पेसिफिकेशन काय? पहा इथे

ROG Phone 9 series स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Elite chip असणार आहे

Asus ROG Phone 9 मध्ये नेमकी फिचर्स, स्पेसिफिकेशन काय? पहा इथे

Photo Credit: 91Mobiles

Asus ROG Phone 9 will reportedly ship with an Android 15-based ROG UI and Game Genie

महत्वाचे मुद्दे
  • phantom black आणि storm white या दोन रंगात मिळणार फोन
  • 50-megapixel ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आणि 32 मेगा पिक्सल सेल्फी शूटर असे
  • ROG Phone 9 series हा स्मार्टफोन 19 नोव्हेंबर दिवशी लॉन्च होणार
जाहिरात

Asus कडून नुकताच ROG Phone 9 series हा स्मार्टफोन 19 नोव्हेंबर दिवशी लॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite आहे. दरम्यान कंपनीने ROG Phone 9 ची झलक Snapdragon Summit मध्ये दाखवली आहे. त्यामुळे डिझाईन समोर आले होते पण आता एका रिपोर्टमध्ये या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे. या मध्ये पूर्वीच्या फोनप्रमाणेच 50-megapixel ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट असणार आहे आणि 32 मेगा पिक्सल सेल्फी शूटर असेल. या फोनमध्ये 5,800mAh बॅटरी असणार आहे.

91Mobiles ने Asus ROG Phone 9 च्या स्पेसिफिकेशनची माहिती फोन 19 नोव्हेंबरला लॉन्च होण्यापूर्वी दिली आहे. फोनच्या फोटो मधील डिझाईन नुसार हा काळा आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध असेल. ज्याला phantom black आणि storm white अशी नावं असतील. फोनच्या मागच्या बाजूला 3 कॅमेरा सेटअप असणार आहे

Asus ROG Phone 9 ची स्पेसिफिकेशन काय असू शकतात?

Asus ROG Phone 9 च्या आधीच्या मॉडेल प्रमाणे यामध्येही 6.78-inch full-HD+ (1,080x2,400 pixels) असणार आहे. 120Hz refresh rate असेल. 2,500 nits peak brightness असेल. HDR10 support असेल. फोनमध्ये 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज असणार आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite असणार आहे याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे.

फोनच्या कॅमेर्‍याचा विचार करता, Asus ROG Phone 9 मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा आहे. ज्यात 50-megapixel Sony Lytia 700 हा मुख्य कॅमेरा असणार आहे. 1/1.56-inch sensor size आहे. 13 मेगा पिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे आणि 5 मेगा पिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. Asus ROG Phone 8 मध्येही अशाच प्रकारचे कॅमेरा सेट अप आहेत.

Asus ROG Phone 9 हा Android 15 बेस्ड ROG UI आणि Game Genie फोन आहे. यामध्ये AirTriggers, Macro, Bypass charging, आणि Scout mode आहे. यामध्ये अनेक AI gaming features आहेत. ज्यात X Sense X Capture AI Grabber आहे. AI call translator, AI transcript, AI wallpaper चा पर्याय आहे. या फोनमध्ये 5,800mAh बॅटरी आहे. 65W wired charging support वर तो चार्ज होणार आहे.

Asus या फोनमध्ये dual stereo speakers देणार आहे. 3.5mm jack आहे आणि 3 मायक्रोफोन्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.3, Wi-Fi 7, NFC, NavIC, GPS, आणि 5G आहे. हा फोन 163.8x76.8x8.9mm आकाराचा आहे तर फोनचं वजन 227 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »