Flipkart ची iPhone 14 साठी सर्वात स्वस्त डील; पहा अ‍पडेट्स

iPhone 14 चा बेस मॉडेल 128GB स्टोरेजसह मिळतो आणि Blue, Midnight, Purple, Starlight तसेच (PRODUCT) RED या रंगांमध्ये उपलब्ध आहे

Flipkart ची iPhone 14 साठी सर्वात स्वस्त डील; पहा अ‍पडेट्स

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२५ मध्ये आयफोन १४ (चित्रात) सवलतीत मिळेल

महत्वाचे मुद्दे
  • यंदाचा Big Billion Days Sale 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे
  • बिग बिलियन डेज सेल मध्ये अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबि
  • आतापर्यंत भारतात iPhone 14 साठी मिळालेला सर्वात कमी दर असून, अपग्रेडची वा
जाहिरात

Flipkart ने त्यांच्या Big Billion Days Sale 2025 साठी मोठी ऑफर जाहीर केली आहे. या सेलमध्ये iPhone 14 फक्त 39,999 रूपये मध्ये उपलब्ध होणार आहे (बँक डिस्काउंटसह). हा दर सध्या असलेल्या 52,990 रूपये च्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे आणि सप्टेंबर 2022 मधील 79,900 रूपये च्या लाँच प्राइसपेक्षा तर जवळपास निम्मा आहे. त्यमुळे आयफोन प्रेमींसाठी ही खास बाब आहे. ई कॉमर्स वेबसाईट वर आता Big Billion Days Sale 2025 ची तयारी सुरू झाली आहे. यंदाचा Big Billion Days Sale 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी उत्सुक असाल तर पहा या सेल मध्ये आयफोन 14 ची किंमत काय असेल?iPhone 14 चा बेस मॉडेल 128GB स्टोरेजसह मिळतो आणि Blue, Midnight, Purple, Starlight तसेच (PRODUCT) RED या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा आतापर्यंत भारतात iPhone 14 साठी मिळालेला सर्वात कमी दर असून, अपग्रेडची वाट पाहणाऱ्यांसाठी फोन खरेदीची ही उत्तम संधी आहे.

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल हा भारतातील सर्वात मोठ्या वार्षिक शॉपिंग इव्हेंटपैकी एक आहे. iPhone 14 ची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा कमी झाल्यामुळे आणि प्रीमियम iPhone 16 सिरीज मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात झाल्यामुळे, या वर्षीचा सेल आतापर्यंतचा सर्वात मोठा अ‍ॅपल आयफोन डील इव्हेंट बनत आहे.

सध्या, iPhone 14 च्या 128 जीबी स्टोरेजसह iPhone 14 चा बेस व्हेरिएंट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ५२,९९० रुपयांना उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच झालेल्या या हँडसेटच्या बेस ऑप्शनची भारतात किंमत त्याच्या पदार्पणाच्या वेळी ७९,९०० रुपये होती. आयफोन 14, 2022 मध्ये लॉन्च झाला होता. काही दिवसांपूर्वीच आयफोन 17 ची घोषणा झाल्यानंतर आयफोन 16 ची किंमतही कमी झाली आहे. या सेलमध्ये आयफोन 16 च्या किंमतीमध्येही मोठी सवलत जाहीर झाली आहे. फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेल दरम्यान आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्सवरही ऑफर्स जाहीर केल्या आहेत. दोन्ही फोनवर मोठ्या सवलती मिळतील. आयफोन १६ प्रो ७०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिला जाईल, तर आयफोन १६ प्रो मॅक्स ९०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल मध्ये अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना 10% त्वरित सूट देखील मिळेल.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »