CMF Phone 2 Pro भारतात लॉन्च; किंमत Rs. 18,999 पासून पुढे

फोन खरेदी करताना Axis, HDFC, ICICI Bank,आणि SBI card युजर्सना 1000 रूपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.

CMF Phone 2 Pro भारतात लॉन्च; किंमत Rs. 18,999 पासून पुढे

Photo Credit: CMF By Nothing

CMF फोन २ प्रो २५६GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजने सुसज्ज आहे

महत्वाचे मुद्दे
  • CMF Phone 2 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Pro chipset
  • काळा, लाईट ग्रीन, ऑरेंज आणि पांढरा रंगांमध्ये CMF Phone 2 Pro असणार उपलब्
  • फोनमध्ये wiredआणि reverse charging सपोर्ट
जाहिरात

CMF Phone 2 Pro भारतामध्ये सोमवारी लॉन्च करण्यात आला आहे. Nothing चा हा स्मार्टफोन चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Pro chipset असणार आहे. MF Phone 2 Pro मध्ये 6.77-inch AMOLED display,120Hz adaptive refresh rate आणि triple rear camera unit आहे. ज्यामध्ये 50-megapixel main sensor आहे. फोनमध्ये IP54-rated बिल्ड असणार आहे. यामध्ये 5,000mAh battery असणार आहे. त्यामध्ये wiredआणि reverse charging चा पर्याय आहे.CMF Phone 2 Pro ची भारतामध्ये किंमत काय?CMF Phone 2 Pro ची भारतामध्ये 8GB + 128GB RAM व्हेरिएंटची किंमत Rs. 18,999 आहे. तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत Rs. 20,999 आहे. हा स्मार्टफोन

काळा, लाईट ग्रीन, ऑरेंज आणि पांढरा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. 5 मे पासून फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तो Flipkart, CMF India website आणि रिटेल पार्टनर्स वर खरेदी करता येणार आहे.

Axis, HDFC, ICICI Bank,आणि SBI card युजर्सना 1000 रूपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. एक्सचेंज वर देखील 1000 रूपयांचा अधिकचे डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे CMF Phone 2 Pro हा स्मार्टफोन Rs. 16,999 पासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

CMF Phone 1, प्रमाणेच नवा Phone 2 Pro मध्ये वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज मिळणार आहेत. त्यामध्ये universal cover, interchangeable lenses, wallet, stand, lanyard,आणि कार्ड होल्डर मिळणार आहे.

CMF Phone 2 Pro ची स्पेसिफिकेशन्स

CMF Phone 2 Pro मध्ये ड्युअल सीम आहे. हा फोन Android 15-based Nothing OS 3.2,वर चालतो. या फोनमध्ये 3 वर्षांचे Android updates आणि 6 वर्षांचे security patches मिळणार आहे. फोनमध्ये 6.77-inch full-HD+ (1,080×2,392 pixels) AMOLED display आहे. डिस्प्ले मध्ये HDR10+ support आणि Panda Glass protectionअसणार आहे.

CMF Phone 2 Pro मध्ये 5,000mAh battery आहे ज्याला 33W fast charging आणि 5W reverse wired charging सपोर्ट आहे. एका चार्ज मध्ये फोन 47 तास कॉलिंग टाईम आणि 22 तासांपर्यंत YouTube streaming time देऊ शकतो. भारतामध्ये फोन सोबत चार्जर देखील मिळणार आहे. फोनचा आकार 164×7.8×78mm आहे तर फोनचं वजन 185g आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. ₹25 हजारांच्या बजेटमध्ये कोणता फोन बेस्ट? Moto G77 Power, Nord CE 6 Lite की iQOO Z10R 5G
  2. समुद्रातही बुडणार नाहीत अंतराळवीर! ISROच्या गगनयानची मोठी कामगिरी
  3. फोनच्या मागे मॅग्नेटिकने फिट, चार्जिंग झटपट! URBN Atom Link लॉन्च
  4. Hisense A10 ने केला धमाका! डिटॅचेबल स्क्रीनची अनोखी जादू
  5. Acerचा अनोखा फोन लॉन्च! दोन डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीची ताकद
  6. वादानंतर Metaचा यू-टर्न! Instagramवरील AI इमेज फीचर हटवले
  7. 50MP कॅमेऱ्याचा Ai+ Nova 2 Ultra 5G तब्बल ₹1,900 स्वस्त; ऑफर चुकवू नका!
  8. ChatGPT वापरून स्ट्रीमिंग कंपनीवर सायबर हल्ला; 15 वर्षीय मुलगा अटकेत
  9. 7600mAh बॅटरीसह iQOO 15R झाला आणखी स्वस्त; मिळतेय भन्नाट डील
  10. भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या कायद्याचे केले कौतुक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »