Boat त्यांचे Nirvana lon headphones 1649 रुपयांना विकत आहे, ज्याची मूळ किंमत 7999 आहे.
Photo Credit: Amazon
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये मोबाईल अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट
Amazon Great Indian Festival Sale 2025 हा यंदा आगामी सणासुदीचे दिवस पाहता 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये विविध कॅटेगरीजमधील शेकडो उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, पीसीज, घरातील उपकरणे, फॅशन प्रॉडक्ट्स आणि बर्याच गोष्टी या सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहतील. आगामी सेलमध्ये मोबाईल अॅक्सेसरीजवर 80 % पर्यंत सूट मिळू शकते. सेलच्या आधीच, ई-कॉमर्स वेबसाइटने काही TWS (ट्रुली वायरलेस स्टीरिओ) हेडसेट्सवर ऑफर्स आणि डील्स सुरू केल्या आहेत, जे आता स्वस्त दरात खरेदी करता येऊ शकतात.
Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 हा प्राइम मेंबर्ससाठी इतरांच्या 24 तास आधी म्हणजे 22 सप्टेंबरला सुरू होणार आहे. इतर सर्व ग्राहक एका दिवसानंतर म्हणजे 23 सप्टेंबर पासून या डील्सचा फायदा घेत खरेदी करू शकतात. वायरलेस हेडसेटवरील काही सुरुवातीच्या डील आधीच ऑनलाइन मार्केटप्लेसवर लाइव्ह आहेत. बोट, नॉईज आणि सोनी सारख्या कंपन्या त्यांच्या नव्या आणि अलीकडील फ्लॅगशिप मॉडेल सवलतीच्या दरात देत आहेत.
बोट त्यांचे Nirvana lon headphones 1649 रुपयांना विकत आहे, ज्याची मूळ किंमत 7999 आहे. सोनीचा WF-C710NSA १२,९९९ रुपयांऐवजी ६,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. JBL Live 770nc, Truke Mega 9 आणि Noise Buds N1 सारखे इतर लोकप्रिय मॉडेल देखील किमतीत कपातीसह लिस्ट करण्यात आले आहेत.
ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहार वापरून केलेल्या खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. निवडक वस्तूंवर नो-कॉस्ट ईएमआय योजना आहेत. आयसीआयसीआय अमेझॉन पे क्रेडिट कार्ड-आधारित ऑफर आणि कूपन ऑफर्स देखील आहेत.
यंदा, ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती वापराच्या वस्तू खरेदी सोबत एआय च्या मदतीने खरेदीचा अनुभव, जलद वितरणासोबत अविश्वसनीय डील मिळण्याची अपेक्षा आहे. अशी भावना एका ब्लॉग़ पोस्टद्वारा अमेझॉनने मांडली आहे.
जाहिरात
जाहिरात