सॅमसंगच्या A सीरीज मधील स्मार्टफोन हे मिड रेंज सेगमेंट मधील फोनचे उत्तम पर्याय आहेत. त्यावरही कंपनीकडून दमदार सूट देण्यात आली आहे.
Photo Credit: SAMSUNG
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा (चित्रात) जानेवारी २०२४ मध्ये लाँच झाला
सॅमसंग कडून त्यांच्या विविध कॅटेगरीमधील फोनवर मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना फ्लॅगशीप स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. यामध्ये Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy S24, Galaxy S24 FE, Galaxy A55, Galaxy M36 यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोनवरील सेल 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ग्राहकांना Samsung.com वर सवलतीच्या दरात फोन विकत घेता येणार आहे. Galaxy S24 Ultra विकत घेण्याचा तुम्ही विचार करत असाल आणि त्याची किंमतीमुळे मागे हटत असाल तर हा सेल तुम्हांला नव्या फोन खरेदीची सुवर्णसंधी देत आहे.Galaxy S24 Ultra, Galaxy S24 आणि Galaxy S24 FE वरील सूटसॅमसंगच्या Galaxy S24 लाईनअपच्या सेलचं खास वैशिष्ट्य म्हणजे Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन Rs 1,29,999 ला लॉन्च झाला होता तो या सेलमध्ये अवघ्या Rs 71,999 मध्ये मिळणार आहे. या फोनवर आता सुमारे 58,000 रूपयांची सूट मिळणार आहे.
Galaxy S24 मध्ये Snapdragon 8 Gen 3 processor आहे. या फोनची किंमत 74999 वरून 39999 करण्यात आली आहे. हा फ्लॅगशीपमधील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे. Galaxy S24 FE हा फोन 59,999 रूपयांमध्ये आला होता आता या फोनवर 50% सूट जाहीर झाली आहे त्यामुळे हा फोन अवघ्या 29,999 रूपयांमध्ये विकत घेता येईल.
सॅमसंगच्या A सीरीज मधील स्मार्टफोन हे मिड रेंज सेगमेंट मधील फोनचे उत्तम पर्याय आहेत. Galaxy A55 5G हा 23,999 रूपयांमध्ये उपलब्ध असेल. लॉन्च च्या वेळेस त्याची किंमत 39,999 रूपये होती. Galaxy A35 5G ची किंमत 30,999 वरून आता 17,999 झाली आहे.
Galaxy M-series स्मार्टफोनमध्ये अनेक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स आहेत. Galaxy M36 5G ची किंमत 19,999 वरून 13,999 करण्यात आली आहे. Galaxy M16 5G ची किंमतही 13,499 वरून सुमारे 10,499 करण्यात आली आहे. Galaxy M06 5G हा सर्वात किफायतशीर स्मार्टफोन आता 7499 रूपयांमध्ये खरेदी करता येईल.Galaxy F-series स्मार्टफोनवरील सवलतसॅमसंग कडून Galaxy F-series वरही डिस्काऊंट्स जाहीर करण्यात आली आहेत. Galaxy F36 5G ची किंमत आता 19,999 वरून 13,999 करण्यात आली आहे. यामध्ये Galaxy F06 5G ची किंमत देखील कमी केल्यानंतर 7499 झाली आहे.
जाहिरात
जाहिरात