सॅमसंगच्या Galaxy Z Fold range सारखीच आयफोन iPhone 18 Fold ची बुक-स्टाईल डिझाइन असण्याची शक्यता आहे.
Photo Credit: Gadgets 360
अॅपलचा फोल్డ్ेबल आयफोन 2026 मध्ये $1,999 किंमतीत येऊ
अॅपलच्या फोनचंं जगभरातील चाहत्यांना नेहमीच आकर्षण आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवा मॉडेल लॉन्च होतो. आता अॅपल त्यांचा फोन फोल्डेबल स्वरूपात देखील आणणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून याची चर्चा होती पण आता रिपोर्ट्सनुसार, अॅपलचा नवा फोल्डेबल फोन आल्यास तो पूर्वीच्या अनुमानापेक्षा स्वस्तात आणि लवकरच येण्याचा अंदाज आहे. TF Securities International analyst Ming-Chi Kuo यांच्या माहितीनुसार या फोनमध्ये अॅपलकडून hinge mechanism चा वापर केला जाऊ शकतो.
Kuo यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका नोट मध्ये hinge component ची सध्या सरासरी विक्री किंमत 70 ते 80 अमेरिकन डॉलर मध्ये असल्याची माहिती दिली आहे. जी भारतीय रूपयांमध्ये 7-8 हजार होते. पूर्वी हीच किंमत मास प्रोडक्शन साठी 100 ते 120 अमेरिकन डॉलर होती. प्रति युनिट भारतीय रूपयांत यासाठी 8 ते 10 हजार रूपये मोजावे लागतील.
कुओ यांच्या माहितीनुसार, कमी किमतीचे कारण स्वस्त कच्च्या मालाचे नसून, अॅपलच्या सप्लाय पार्टनर्स कडून केलेल्या असेंब्ली डिझाइन आणि उत्पादन कार्यक्षमता आहे. या विकासामुळे अॅपलला नफा सुधारण्यास किंवा काही बचत ग्राहकांना देण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे फोल्डेबल आयफोन प्रतिस्पर्धी ऑफरिंगपेक्षा अधिक स्वस्त बनू शकतील असा अंदाज आहे. या प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी, फॉक्सकॉन आणि तैवानी उत्पादक Shin Zu Shing (SZS) यांनी foldable hinge तयार करण्यासाठी खास एक संयुक्त उपक्रम सुरू केल्याचे वृत्त आहे. फॉक्सकॉनकडे थोडा मोठा हिस्सा असल्याचे म्हटले जाते आणि ते सहकार्यात धोरणात्मक निर्णयांचे नेतृत्व करणार आहेत.
अॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन iPhone 18 Fold म्हणून लाँच होण्याची शक्यता आहे आणि त्यात सॅमसंगच्या Galaxy Z Fold range सारखीच बुक-स्टाईल डिझाइन असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 7.8-इंच इंटर्नल डिस्प्ले आणि 5.5-इंच बाह्य स्क्रीन असण्याची चर्चा आहे, जी पोर्टेबिलिटी आणि उत्पादकता यांच्यात बॅलन्स ठेवणार आहे.
कुओच्या मते, फोल्डेबल आयफोन सप्टेंबर 2026 मध्ये iPhone 18 मालिकेसोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्याच्यात प्रगत डिझाइन आणि प्रीमियम मटेरियल असूनही, हा फोन सुमारे $1,999 ,अंदाजे 1.74 लाख रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येऊ शकतो, जो तो सध्याच्या फ्लॅगशिप फोल्डेबलपेक्षा जास्त असण्याऐवजी त्यांच्याशी जुळवून घेईल.
जाहिरात
जाहिरात