सॅमसंग स्टोअर वरून Samsung Galaxy A17 5G हा फोन आता निवडक भागामध्ये प्री ऑर्डर साठी खुला करण्यात आला आहे.
Photo Credit: Samsung
Samsung Galaxy A17 5G मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे
Galaxy A16 5G चा उत्तराधिकारी म्हणून Samsung Galaxy A17 5G हा स्मार्टफोन बुधवार 6 जून दिवशी निवडक बाजारात लॉन्च झाला आहे. हार्डवेअरच्या विभागात Samsung Galaxy A17 5G हा स्मार्टफोन पूर्वीच्या फोनप्रमाणेच आहे. या स्मार्टफोनमध्ये super AMOLED display सोबत Exynos chip असणार आहे. या फोनमध्ये triple camera setup आहे. तर फोनमध्ये 5000mAh battery चा समावेश आहे. मग अशा दमदार फीचर्सचा समावेश असलेल्या Galaxy A-series smartphone मध्ये अजून काय खास असणार आहे ? या आगामी स्मार्टफोनची किंमत काय आहे? सारं जाणून घ्या.
Samsung Galaxy A17 5G हा स्मार्टफोन 4GB + 128GB या व्हेरिएंट मध्ये युरोपात आला असून त्याची किंमत EUR 239 म्हणजे अंदाजे भारतीय रूपयां मध्ये 24 हजार आहे. हा फोन अन्य कॉन्फ्युगरेशन मध्येही उपलब्ध होईल असा अंदाज आहे. त्यामध्ये 8GB RAM आणि 256GB storageपर्यंत क्षमता असण्याचा अंदाज आहे. हा स्मार्टफोन Black, Gray, आणि Blue रंगामध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A17 5G मध्ये 6.7-inch full-HD+ (2,340 x 1,080 pixels) Super AMOLED display असून सोबत 90Hz refresh rate आहे. हा स्मार्टफोन octa-core Exynos 1330 SoC वर चालतो. यामध्ये 128GB बिल्ड इन स्टोरेज आहे. जे microSD card च्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन One UI 7.0 pre-loaded आहे. जो Android 15 वर बेस्ड आहे. यामध्ये 6 वर्षांचा Android OS updates आणि 6 वर्षांचा security patches मिळणार आहे.
Samsung Galaxy A17 5G मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑटोफोकससह 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. त्याच्यासोबत f/2.2 अपर्चरसह 2MP चा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी f/2.0 अपर्चरसह 13MP चा कॅमेरा आहे. A17 5G मध्ये 5,000mAh battery असून त्याला 25W wired fast charging चा सपोर्ट आहे. फोनमध्ये सिक्युरिटी साठी side-mounted fingerprint sensor आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी Bluetooth v5.3, Wi-Fi 5, GPS, NFC, आणि USB-C port आहे. फोन IP54 रेटेड आहे. त्यामुळे फोन धूळ. पाण्याचा प्रतिरोध करू शकेल.
सॅमसंग स्टोअर वरून Samsung Galaxy A17 5G हा फोन आता निवडक भागामध्ये प्री ऑर्डर साठी खुला करण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात