सॅमसंग गॅलेक्सी एस२५ अल्ट्रामध्ये बिल्ट-इन एस-पेन स्टायलस आहे.
सॅमसंगने भारतात त्यांच्या फ्लॅगशिप Galaxy S25 Ultra ची किंमत तात्पुरती कमी केली आहे. ग्राहकांना आता हा फोन मर्यादित कालावधी साठी ऑफर्स मध्ये विकत घेता येईल. जानेवारी 2025 मध्ये लाँच झालेल्या या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी चिपसेटसाठी कस्टम Snapdragon 8 Elite, 200-megapixel main sensor सह quad-camera सेटअप आणि अॅडव्हान्स Galaxy AI features आहेत. मर्यादित काळासाठी, थेट सवलतीचा आनंद घेऊ शकतात, तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांद्वारे अतिरिक्त बचतीचा आनंद घेऊ शकतात.भारतात लाँच केलेला Galaxy S25 Ultra 12 जीबी + 256 जीबी मॉडेलसाठी ₹1,29,999 किमतीत उपलब्ध आहे मात्र आता हा फोन सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. सॅमसंग इंडिया ऑनलाइन स्टोअर सध्या मर्यादित काळाच्या डीलचा भाग म्हणून प्रीमियम स्मार्टफोनच्या सर्व कॉन्फिगरेशनवर 12 हजार रूपयांची ची सूट देत आहे.
जारी सवलतीसह, बेस व्हेरिएंटची किंमत आता ₹1,17,999 आहे, तर 12 जीबी + 512 जीबी व्हेरिएंटची किंमत ₹1,29,999 आहे, जी त्याची मूळ किंमत ₹1,41,999 होती. ग्राहक सॅमसंगच्या Trade-in Program चा फायदा घेऊन किंमत आणखी कमी करू शकतात. एक्सचेंज केलेल्या डिव्हाइसच्या मॉडेल आणि स्थितीनुसार, यूजर्सना एक्सचेंज व्हॅल्यू मध्ये ₹75,000 मिळू शकतात. निवडक बँक क्रेडिट कार्डधारक (जसे की ICICI, HDFC आणि SBI) 1250 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलती मिळवू शकतात, ज्यामुळे फोनची किंमत 1,03,150 रुपयांपर्यंत कमी होते.
अतिरिक्त पेमेंट फायद्यांमध्ये ₹9,833.24 प्रति महिना पासून सुरू होणारे नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि ₹5,721.37 पासून सुरू होणारे ईएमआय प्लॅन समाविष्ट आहेत. सॅमसंग एक मल्टी-बाय प्रमोशन देखील चालवत आहे, ज्यामध्ये ग्राहकांनी Galaxy S25 Ultra सोबत Galaxy Watch Ultra किंवा Galaxy Buds 3 series खरेदी केल्यास18,000 पर्यंतची बंडल सूट दिली जात आहे.
Galaxy S25 Ultra मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट, 12 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 120 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.9 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. 200-megapixel main camera आहे तर 12-megapixel selfie camera आहे. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 5,000mAh battery आहे.
जाहिरात
जाहिरात