Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip

Galaxy S26 series हा या लाइनअपमधील टॉप-टियर मॉडेल बनत आहे. यात 6.9 इंचाचा मोठा M14 QHD+ CoE डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip

Photo Credit: Samsung

सॅमसंग वायरलेस कामगिरी वाढविण्यासाठी Galaxy S26 मालिकेत Exynos 2600 सोबत ही डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी चिप वापरण्याची योजना आखत असू शकते.

महत्वाचे मुद्दे
  • Galaxy S26 series मार्च मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे
  • Samsung Galaxy S26 मधील तीन मॉडेल्स डेव्हलपमेंटच्या अंतिम टप्प्यात असण्या
  • Galaxy S26 मध्ये नवीन Exynos कनेक्टिव्हिटी चिप येईल
जाहिरात

Samsung Galaxy S26 series हा सॅमसंगचा नवा आणि आगामी लाईनअप पुढील वर्षी येण्याचा अंदाज आहे. या आगामी Galaxy S26, Galaxy S26+, आणि Galaxy S26 Ultra मॉडेल्स मध्ये Exynos 2600 आहे. काही मार्केट्स मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 chipset चा देखील समावेश असू शकतो. Bluetooth SIG वेबसाइटवरील एका नोंदीवरून असे सूचित होते की नवीन फ्लॅगशिपमध्ये कदाचित हे एकमेव चिप्स नसतील. सॅमसंग आगामी Galaxy S26 सीरीज मध्ये मुख्य प्रोसेसरसोबत एक नवीन Exynos कनेक्टिव्हिटी चिप सादर करू शकते.

Samsung च्या Exynos S6568 Chip चा सपोर्ट Privacy Features मध्ये सुधारणा करणार

Bluetooth SIG वेबसाइटवर Exynos S6568 म्हणून ओळखली जाणारी एक नवीन सॅमसंग चिप समोर आली आहे. ही नोंद गोष्ट समोर आणते की रिलीज न झालेली Exynos चिप Bluetooth 6.1 आणि Wi-Fi connectivity ला सपोर्ट करते आणि "सुसंगत Exynos अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसर" सोबत काम करण्यासाठी आहे, कदाचित येणाऱ्या Exynos 2600 चा संदर्भ देत असेल.

कंपनीच्या पूर्वीच्या लाँच वेळापत्रकानुसार, आगामी Galaxy S26 सीरीज विकासाच्या अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता आहे. Exynos S6568 चिपच्या अलिकडच्या सर्टिफिकेशनमधून असे दिसून येते की सॅमसंग वायरलेस कामगिरी वाढविण्यासाठी Galaxy S26 मालिकेत Exynos 2600 सोबत ही डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी चिप वापरण्याची योजना आखत असू शकते. ब्लूटूथ SIG ने मे महिन्यात ब्लूटूथ 6.1 स्टॅन्डर्डची घोषणा केली.

सॅमसंग जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नेहमीच्या लाँच विंडोऐवजी पुढील वर्षी मार्चमध्ये Galaxy S26 series सादर करण्याची अपेक्षा आहे. अमेरिका, जपान आणि चीनसारख्या निवडक देशांमध्ये ही फ्लॅगशिप मालिका Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरवर चालण्याची अपेक्षा आहे. दक्षिण कोरिया आणि युरोपसह बाजारपेठांमध्ये सॅमसंगच्या इन-हाऊस Exynos 2600 chip सह ती पाठवली जाईल असे म्हटले जाते. तुलनेसाठी, सध्याची Galaxy S25 models सर्व बाजारपेठांमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर चालतात.

Galaxy S26 series हा या लाइनअपमधील टॉप-टियर मॉडेल बनत आहे. यात 6.9 इंचाचा मोठा M14 QHD+ CoE डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. मागील बाजूस, यात 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो,50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्ससह क्वाड-कॅमेरा सेटअप असू शकतो. यात 60 W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये फक्त 7.9 मिमी जाडीसह स्लिम प्रोफाइल असल्याचे देखील वृत्त आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »