आगामी Redmi K90 Pro मध्ये सर्वोत्तम बॅटरी असू शकते. फोनमध्ये मोठी बॅटरी आणि 100 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
Photo Credit: Realme
Redmi K90 Pro मध्ये 50MP Light Fusion 95 प्रायमरी, 50MP अल्ट्रా-वाइड, आणि 50MP Samsung JN5 पेरिस్కोप टेलीफोटो कॅमेरे असू शकतात
Redmi लवकारच चीन मध्ये Redmi K90 सीरीज लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार या सीरीज मध्ये Redmi K90 आणि Redmi K90 Pro चा समावेश असल्याची चर्चा आहे. दरम्यान या फोन्सपैकी K90 हा आधीच Geekbench Listing दिसल्याची माहिती आहे. तर आता त्या पाठोपाठ K90 Pro देखील Geekbench प्लॅटफॉर्मवर स्पॉट झाला आहे. त्यामधील काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर अनेक टीपस्टार्सनी K90 Pro च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल अंदाज व्यक्त केले आहेत.
टीपस्टार्सच्या माहितीनुसार, Geekbench Listing मध्ये आगामी Redmi K90 मॉडेल नंबर 25102RKBEC सोबत दिसला आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असण्याचा अंदाज आहे. यामध्ये दोन हाय परफॉर्ममन्स कोअर 4.21GHz चा स्पीड आणि सहा कोर 3.6GHz वर काम करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB RAM आणि Android 16 ऑपरेटिंग सिस्टम असण्याचा अंदाज आहे. या फोनने 3559 सिंगल कोअर स्कोअर आणि 11,060 मल्टी कोर स्कोर मिळवला आहे. म्हणजेच या अंदाजांवरून Redmi K90 हा त्याच्या आधीच्या फोनच्या तुलनेत दमदार असू शकतो असं म्हटलं जात आहे.
टीपस्टार्स डिजिटल चॅट स्टेशनची माहितीपाहता त्यांच्या दाव्यानुसार, आगामी Redmi K90 Pro मध्ये सर्वोत्तम बॅटरी असू शकते. फोनमध्ये मोठी बॅटरी आणि 100 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये 7,000mAh ते 7,500mAh ची बॅटरी असेल. सोबत 50 W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील असू शकतो.
लीक्स मधून समोर आलेल्या माहितीमध्ये Redmi K90 Pro मध्ये 50MP Light Fusion 95 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP Samsung JN5 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. टीपस्टार्सच्या महितीनुसार यावेळी फोनची डिझाइन आणि बिल्ड क्वालिटी फ्लॅगशिप-ग्रेड असू शकते आणि ऑडिओ परफॉर्मन्समध्ये देखील लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Redmi K90 Pro फोनची स्क्रीन पाहता ती, 6.59-इंच फ्लॅट RGB OLED LTPS डिस्प्ले सह असण्याची अपेक्षा आहे. यात USB 3.0 इंटरफेस आणि अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील असू शकतो. हा फोन HyperOS 3 आणि Android 16 वर चालण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात