Photo Credit: Google
Android 16 आता नववर्षामध्ये म्हणजे 2025 च्या फर्स्ट हाफ मध्ये रिलीज होणार आहे अशी माहिती गूगल कडून समोर आली आहे. Google पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्याची पुढील महत्त्वाची Android आवृत्ती लाँच करेल, त्यानंतर वर्षाच्या अखेरीस एक minor release होईल. परिणामी, App Stability सुधारताना, युजर्सना नवीन फीचर्स आणण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनीकडे वारंवार Android सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) रिलीज होईल.
Android Developers Blog च्या पोस्ट मध्ये दिलेल्या माहिती मध्ये 2025 च्या Q2 मध्ये मोठे अपडेट्स येणार आहेत. तर चौथ्या तिमाही मध्ये किरकोळ अपडेट्स येणार आहेत. आता Android 16 लवकरात लवकर पात्र डिव्हाईसमध्ये लॉन्च होणार आहेत. सध्या गूगल कंपनीने Android 16 च्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण त्याच्या रीलीजची टाइमलाइन शेअर करून, कंपनीने स्पष्ट केले आहे की नवीन ऑपरेटिंग सिस्टम युजर्सच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करेल. याव्यतिरिक्त, डेव्हलपर्सना त्यांच्या ॲप्सची चाचणी घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
Q2 2025 मध्ये येणारे major SDK रीलीज मध्ये Behaviour Changes आहेत. ज्यात APIs आणि फीचर्स आहेत. Google च्या नुकत्याच लाँच झालेल्या Android 15 मध्ये अनेक मोठी सिक्युरिटी फीचर्स देण्यात आली आहेत. सध्या, नवी Android ऑपरेटिंग सिस्टम Google च्या Pixel डिव्हाइसेस तसेच OnePlus, Xiaomi, iQOO सारख्या ब्रँडच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी आणली गेली आहे.
Google लवकरच Android डेवलपर्स चाचणीसाठी Android 16 रिलीज करू शकते. बीटा लॉन्च होण्यापूर्वी कंपनी डेवलपर प्रीव्यू ऑफर करते. आता त्याच्या लॉन्च साठी सुमारे पाच महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीत त्याचा डेव्हलपर बीटा लवकरच रिलीज होऊ शकतो.
या वर्षाच्या सुरुवातीला, Google ने Pixel 9 series आणली. जे एक वर्ष जुन्या Android 14 आउट-ऑफ-द-बॉक्ससह आले होते. कंपनीच्या स्मार्टफोन्सना दोन महिन्यांनंतर, 15 ऑक्टोबर रोजी Android 15 वर अपडेट आले होते. Android 16 रिलीझ टाइमलाइन पाहता Pixel 10 सीरीज 2025 मध्ये Google च्या ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोन असू शकतात.
जाहिरात
जाहिरात