Google Pixel 10 Pro Fold 5G हा बुक-स्टाईल फोल्डेबल हँडसेट 3nm टेन्सर G5 चिपसेट सह असणार आहे, ज्यामध्ये टायटन M2 सुरक्षा चिप आणि 16GB LPDDR5X रॅम आहे.
Photo Credit: Google
गुगल पिक्सेल १० प्रो फोल्ड (चित्रात) मागील मॉडेलप्रमाणेच डिझाइनमध्ये आहे
Google कडून नव्या Pixel 10 series ची घोषणा करण्यात आली आहे. “Made by Google” इव्हेंट मध्ये हे नवे मोबाईल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये फोनमधील नवे अपग्रेड्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स यांची माहिती देण्यात आली आहे. Pixel 10 5G, Pixel 10 Pro 5G, Pixel 10 Pro XL 5G आणि Pixel 10 Pro Fold 5G या चार स्मार्टफोन्सचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अपग्रेड्ससोबतच, स्मार्टफोन्समध्ये नवीन Android 16 with Material 3 Expressive UI देखील आहे जे एक नवीन लूक आणि यूजर अनुभव देतात. कामगिरीसाठी, चारही मॉडेल्समध्ये Tensor G5 chip आणि 16GB of RAM आहे, जे त्यांच्या आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत उत्तम कामगिरी देते. म्हणूनच, जर तुम्ही फ्लॅगशिप अपग्रेडची योजना आखत असाल, तर Google Pixel 10 series हा योग्य पर्याय असू शकतो.
Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये 6.4-इंचाचा Actua कव्हर डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह 8-इंचाचा सुपर Actua Flex डिस्प्ले आहे. फोल्डेबलची जाडी 5.2 मिमी आहे Google Pixel 10 Pro Fold 5G चे वजन 258 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन Google Tensor G5 आणि Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे, जो 16GB RAM सह जोडलेला आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी, 48 MP चा मुख्य कॅमेरा,10.5 MP चा अल्ट्रा-वाइड मॅक्रो फोकस कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमसह 10.8 MP चा टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.
Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये AI-backed फीचर्सचादेखील समावेश आहे. हा हँडसेट Gemini Live, सर्कल टू सर्च आणि कॉल असिस्टंला सपोर्ट करतो. शिवाय, नवीन जेमिनी पॉवर्ड कॅमेरा कोच फीचरसह विविध इमेजिंग फीचर्स तसेच Add Me, Face Unblur,बेस्ट टेक, ऑटो फ्रेम, मॅजिक इरेजर, रीइमॅजिन, पोर्ट्रेट यांचाही समावेश असणार आहे. फोनमध्ये 5015mAh बॅटरी आहे जी 30W वायर्ड आणि 15W Qi2 वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
Google Pixel 10 Pro Fold 5G ची किंमत 256 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी $1,799 (अंदाजे 1,56,600 रुपये) पासून सुरू होते. हे 512 GB आणि 1TB स्टोरेज पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत अनुक्रमे $1,919 (अंदाजे 1,67,000 रुपये) आणि $2,149 (अंदाजे 1,87,000 रुपये) आहे.
जाहिरात
जाहिरात