HMD Arc झाला Self-Repairable Design सह लॉन्च; पहा स्पेसिफिकेशन्स

HMD Arc मध्ये 13-megapixel primary rear camera आहे. जो ऑटोफोकस आणि 5-megapixel selfie camera सह आहे

HMD  Arc झाला Self-Repairable Design सह लॉन्च; पहा स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: HMD

एचएमडी आर्क सिंगल शॅडो ब्लॅक कलरवेमध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • HMD Arc मध्ये 6.52-inch HD+ LCD screen आहे
  • हा हॅन्डसेट 60Hz HD+ display,13-megapixel rear camera सह उपलब्ध होईल
  • HMD Arc मध्ये Unisoc 9863A chipset चा समावेश
जाहिरात

HMD Arc हा स्मार्टफोन थायलंड मध्ये नुकताच लॉन्च झाला आहे. HMD च्या strategy नुसार, हा फोन self-repairable design चा आहे. त्यामध्ये युजर्सना बॅटरी आणि स्क्रीन स्वतःच बदलता येणार आहे. यासाठी युजर्सना किमान ट्रेनिंग पुरेसे आहे. हा हॅन्डसेट 60Hz HD+ display,13-megapixel rear camera सह उपलब्ध होईल. हा फोन Android 14 (Go Edition) वर चालणार आहे. अद्याप या फोनच्या उप्लब्धतेबद्दल आणि किंमतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

HMD Arc ची स्पेसिफिकेशन्स

HMD Arc मध्ये 6.52-inch HD+ (576 x 1,280 pixels) LCD screen आहे. तर 60Hz refresh rate, 20:9 aspect ratio, आणि 460 nits peak brightness level आहे. फोनच्या डायमेंशनचा विचार करता तो 166.4 x 76.9 x 8.95mm आकाराचा आहे. तर फोनचं वजन 185.4 ग्राम आहे. या हॅन्डसेटला IP52 (Europe) किंवा IP54डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग आहे.

HMD Arc हा Unisoc 9863A chipset सह पेअर केलेला फोन आहे. त्यामध्ये 4GB of RAM आणि 64GB onboard storage आहे. हा फोन Android 14 (Go Edition) वर चालतो. स्टोरेजचा विचार करता हा फोन 128GB पर्यंत microSD card ने वाढवता येऊ शकतो. तरा कंपनीच्या माहितीनुसार, स्मार्टफोनला दोन वर्षांचे तिमाही सुरक्षा अपडेट्स दिले जातील.

फोनच्या कॅमेर्‍याचा विचार करता HMD Arc मध्ये 13-megapixel primary rear camera आहे. जो ऑटोफोकस आणि 5-megapixel selfie camera सह आहे. कॅमेरा हा bokeh, night mode, professional mode, slow motion, quick snapshot, filters, time-lapse,आणि panorama ला सपोर्ट करणारा आहे. HMD ने LED flash समाविष्ट केले आहे. यामध्ये सिंगल स्पिकर असून मायक्रोफोन युनिट आहे.

HMD हॅन्डसेट मध्ये 5,000mAh बॅटरी आहे तर 10W wired charging आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, a 3.5mm audio jack आणि USB Type-C port आहे. HMD Arc मध्ये side-mounted fingerprint sensor आहे. virtual RAM support, accelerometer, ambient light sensor, आणि proximity sensor आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  2. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  3. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  4. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  5. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  6. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  7. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  8. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  9. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
  10. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »