HMD Barbie फोनमध्ये 2.8-inch QVGA inner screen आणि 1.77-inch QQVGA cover display आहे.
Photo Credit: HMD
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये एचएमडी बार्बी फोन लाँच करण्यात आला होता.
HMD Barbie Phone भारतामध्ये 21 एप्रिल पासून विक्रीसाठी खुला होणार आहे. हा फ्लिप स्टाईल फोन मागील महिन्यात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2.8-inch inner display आणि 1.77-inch cover screen आहे. नावाप्रमाणेच HMD phone फोन हा बार्बी थीम वर ब नवण्यात आला आहे. फोन आणि त्याच्या अॅकसेसरीज गुलाबी रंगामध्ये आहेत. फोनचा बॉक्स हा ज्वेलरी बॉक्सच्या दुप्पट आहे. मागील वार्षी ऑगस्ट महिन्यात हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये काही निवडक बाजारात उपलब्ध होता. HMD Barbie Phone मध्ये 1,450mAh battery आहे.HMD Barbie Phone ची भारतामधील किंमत काय?HMD Barbie Phone हा भारतामध्ये 7999 मध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन HMD India website वर आज दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी खुला असेल. हा केवळ गुलाबी रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
HMD ने बार्बी थीमची बॅक कव्हर्स, स्टिकर्स, बीड्स अर्थात आकर्षक मण्यांची माळ सोबत आणली आहे. हा फ्लिप फोन अमेरिकेमध्ये मागील वर्षी $129 म्हणजे भारतीय रूपयांमध्ये सुमारे 10,800 मध्ये लॉन्च केला होता.
HMD Barbie Phone मध्ये ड्युअल सीम आहेत. हा फोन S30+ operating system वर चालतो. सोबत बार्बी थीम ची वॉलपेपर्स आहेत. संबंधित अॅप्स देखील त्याच थीम वर आहेत. फोनमध्ये 2.8-inch QVGA inner screen आणि 1.77-inch QQVGA cover display आहे. बाहेरील बाजूची स्क्रीन ही आरश्याच्या दुप्पट आकारात आहे. हा फोन Unisoc T107 SoC ने सज्ज असून तो 64MB of RAM आणि 128MB of onboard storage सोबत जोडलेला आहे. हा फोन microSD card च्या मदतीने सुमारे 32GB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0, a 3.5mm audio jack,USB Type-C port आहे. तर FM radio हा wired आणि wireless modes मध्ये वापरता येणार आहे. MP3 player देखील आहे. यामध्ये 0.3-megapixel rear camera हा LED flash सह आहे. या फोनमध्ये 1,450mAh removable battery आहे.
HMD Barbie Phone बंद केलेला असेल तेव्हा त्याचा आकार 18.9x108.4x55.1mm आहे तर वजन 123.5 ग्राम आहे.
जाहिरात
जाहिरात
Neutrino Detectors May Unlock the Search for Light Dark Matter, Physicists Say
Uranus and Neptune May Be Rocky Worlds Not Ice Giants, New Research Shows
Steal OTT Release Date: When and Where to Watch Sophie Turner Starrer Movie Online?
Murder Report (2025): A Dark Korean Crime Thriller Now Streaming on Prime Video