कंपनीचा दावा आहे की फोनमधील प्रोसेसर Adreno GPU कामगिरी 59% पर्यंत सुधारू शकतो.
HMD सध्या त्यांच्या मॉड्यूलर स्मार्टफोन प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या जनरेशनवर काम करत आहे, ज्याला HMD Fusion 2 असे नाव देण्यात आले आहे. हा फोन भारतात अलीकडेच दाखल झालेल्या पहिल्या जनरेशन एचएमडी फ्यूजनचा उत्तराधिकारी असण्याची अपेक्षा आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वी, X वर पोस्ट केलेल्या लीक झालेल्या माहितीनुसार हार्डवेअर अपग्रेड्स आणि नवीन मॉड्यूलर आउटफिट्सचा सेट समोर आला आहे जो डिव्हाइसच्या मुख्य प्रस्तावाचा भाग असेल. मग पहा लीक झालेल्या स्पेसिफिकेशनमध्ये कशाचा समावेश असेल.
HMD Meme ने X वर शेअर केलेल्या माहितीनुसार, HMD Fusion 2 मध्ये मध्ये snap-on modules साठी Pogo Pin 2.0 कनेक्टिव्हिटीसह Smart Outfits Gen 2 असण्याची शक्यता आहे. हे अॅक्सेसरीज फोनच्या मागील पॅनलवर ठेवलेल्या सहा पोगो पिनद्वारे जोडल्या जातात. फोनचा सीपीयू 4nm प्रक्रियेवर बनवलेला आहे आणि तो 2.4GHz पर्यंत क्लॉक करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की हा प्रोसेसर Adreno GPU कामगिरी 59% पर्यंत सुधारू शकतो.
लीकमध्ये Full HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-inch OLED display हायलाइट केला आहे. डिव्हाइसला पॉवर देणारा Qualcomm चा Snapdragon 6s Gen 4 chipset असल्याचे म्हटले जाते.
HMD Fusion 2 फोनमध्ये कॅमेरा पाहता हँडसेटमध्ये ड्युअल-रेअर कॅमेरा सेटअप असण्याची चर्चा आहे ज्यामध्ये OIS द्वारे सपोर्ट असलेला 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. इतर रिपोर्ट्समध्ये ड्युअल स्पीकर्स, ब्लूटूथ 5.3, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि धूळ आणि पाण्यापासून फोन सुरक्षित राहण्यासाठी IP65 रेटिंग असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टिपस्टर च्या माहितीनुसार, HMD यावेळी मॉड्यूलर आउटफिट्सची सविस्तर श्रेणी सादर करेल, ज्यामध्ये Kickstand Casual Outfit, वायरलेस चार्जिंग आउटफिट, रग्ड आउटफिट, गेमिंग आउटफिट, कॅमेरा ग्रिप आउटफिट, फ्लॅशी आउटफिट, स्पीकर आउटफिट, क्यूआर/बारकोड आउटफिट आणि स्मार्ट प्रोजेक्टर आउटफिट असे पर्याय असू शकतात. पण, लीकमध्ये असा दावा देखील करण्यात आला आहे की नवीन स्मार्ट आउटफिट्स पहिल्या पिढीच्या फ्यूजन मॉडेलशी सुसंगत नसतील, जे पिन लेआउट किंवा मॉड्यूल स्टॅन्डर्ड्समध्ये सुधारणा दर्शवते.
लीकमध्ये HMD Fusion 2 च्या लाँचसाठी कोणत्याही टाइमलाइन किंवा प्रदेशांचा उल्लेख नाही. HMD ने फ्यूजन 2, त्याच्या मॉड्यूलर अॅक्सेसरीज किंवा रोलआउट प्लॅनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
जाहिरात
जाहिरात
Cat Adventure Game Stray is Reportedly Coming to PS Plus Essential in November