नव्याने लॉन्च झालेल्या HMD Fusion ची किंमत आणि वैशिष्ट्ये

नव्याने लॉन्च झालेल्या HMD Fusion ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Photo Credit: HMD

HMD Fusion comes with Android 14 with a promise of two years of OS upgrades

महत्वाचे मुद्दे
  • स्मार्ट आउटफिट्स सहा पिनद्वारे डिव्हाइसशी संलग्न केले जाऊ शकतात
  • HMD Fusion मध्ये दोन रियर कॅमेऱ्यांचा सेटअप बसविण्यात आला आहे
  • HMD Fusion या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे
जाहिरात

HMD ने IFA 2024 मध्ये कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन म्हणजेच HMD Fusion सध्या लॉन्च केला आहे. मोटो मोड्सप्रमाणेच फोनच्या कार्यक्षमतेत भर घालणारे नवीन प्रकार सक्षम करण्यासाठी मागे सहा-पिन कनेक्टरसोबत मॉड्यूलर डिझाइन मध्ये हा स्मार्टफोन बनविण्यात आला आहे. त्याला 'स्मार्ट आउटफिट्स' असेही म्हंटले जात आहे ज्याचे Casual, Rugged आणि Flashy असे तीन प्रकार पडतात . प्रत्येक पोशाख फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये त्वरित बदल करण्यासोबतच नवीन क्षमता, अद्वितीय इंटरफेस आणि वर्धित कार्यप्रदर्शन अनलॉक करण्यास सक्षम आहे. चला तर मग बघुया, या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत.

HMD Fusion ची किंमत

HMD Fusion हा स्मार्टफोन फक्त एका काळया रंगामध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या UK च्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून तो भारतीय 24,000 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन भारतात केव्हा लॉन्च होईल आणि खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येईल याबाबत कोणतीही स्पष्टता कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

HMD Fusion ची वैशिष्ट्ये

HMD Fusion हा स्मार्टफोन Android 14 वर जरी चालत असला तरीसुद्धा कंपनीकडून यामध्ये तीन वर्षाचे सुरक्षा अपडेट्स आणि दोन वर्षांचे OS अपडेट्स देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा HD+ डिस्प्ले बसविण्यात आला असून, 120Hz चा रिफ्रेश रेट असलेला आणि 20 : 9 चा अस्पेक्ट रेशो असलेल्या या डिस्प्ले ची तेजस्विता 600 nits पर्यंत वाढविण्यात येते.

HMD Fusion हा स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 2 या चिपसेट द्वारे समर्थित आहे. या स्मार्टफोनची रॅम 8 GB इतकी असून स्टोरेज क्षमता 256 GB इतकी आहे. त्यासोबतच मायक्रो एसडी स्लॉट सोबत या स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता 1 TB पर्यंत वाढवता येणे देखील शक्य आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 108 मेगापिक्सलचा असून त्यामध्ये 2 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देखील बसविण्यात आला आहे. सेल्फी आणि विडियो कॉल क्या उत्तम अनुभवसाठी यामध्ये 50 मेघा पिक्चर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नुकत्याच लाँच झालेल्या HMD Skyline प्रमाणेच नवीन फ्युजनची बॅटरी आणि इतर घटक iFixit किट वापरून वापरकर्त्यांना सहजपणे बदलता येऊ शकतात. या स्मार्टफोनला IP52 रेटिंग सुध्दा मिळाले आहे.

Comments
पुढील वाचा: HMD Fusion, HMD Fusion Price, HMD
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »