50MP सेल्फी कॅमेरा सह येतोय HMD चा नवा स्मार्टफोन; पहा अपडेट्स

50MP सेल्फी कॅमेरा सह येतोय HMD चा नवा स्मार्टफोन; पहा अपडेट्स

Photo Credit: HMD

HMD Orka निळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असू शकते

महत्वाचे मुद्दे
  • HMD Orka मध्ये आयताकृती Rear Camera Module असणार
  • स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 5G chipset असण्याचा अंदाज
  • HMD Orka मध्ये 6.78-inch 120Hz full-HD+ IPS LCD screen असणार
जाहिरात

HMD Orka हा Finnish OEM मधील आगामी स्मार्टफोन आहे. या फोनबद्दल अद्याप अपडेट्स समजू शकलेले नाहीत पण फोनच्या लीक झालेल्या रेंडर्स वरून त्याच्या रंगांच्या अपडेट्स बद्दल माहिती मिळाली आहे. या फोनच्या काही फीचर्स बद्दलही माहिती मिळाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, डिझाईन, कलर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. HMD Fusion मध्ये interchangeable covers आहेत ज्यांना 'Smart Outfits' संबोधलं जात आहे. हा भारतामध्ये लॉन्च झालेला लेटेस्ट हॅन्डसेट आहे.

HMD Orka च्या डिझाईन, रंग बद्दल महत्त्वाची माहिती

HMD Orka चं अंदाजे डिझाईन हे X वर HMD_MEME'S (@smashx_60) कडून शेअर केले आहे. पोस्टच्या माहितीनुसार, हा फोन निळा, हिरवा आणि पर्पल रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान 'Orka' हे फोनचे खरे नाव असेल की इंटर्नल कोडनेम असेल हे स्पष्ट नाही. फोनमध्ये पॉली कार्बोनेट बॉडी असल्याचे दिसत आहे. जे मिड-रेंज सेगमेंट लक्षात घेता अपेक्षित आहे.

HMD Orka मध्ये रेअर पॅनल वर डाव्या कोपर्‍यामध्ये आयताकृती कॅमेरा असणार आहे. यामध्ये कॅमेरा सेंसर आहे. LED flash unit आहे. त्यावर ‘108MP AI Camera' असं कोरलेलं असतं.

HMD Orka मध्ये फ्लॅट स्क्रीन असणार आहे. त्यामध्ये slim bezels आहे. फोनमध्ये उजव्या बाजूला power button आणि volume rocker आहे.

HMD Orka ची स्पेसिफिकेशन्स

HMD Orka handset मध्ये 6.78-inch full-HD+ IPS LCD screen आहे. सोबत 120Hz refresh rate आहे. लीक्सनुसार, स्मार्टफोनमध्ये Qualcomm ची Snapdragon 5G chipset असणार आहे. पण अद्याप SoC ची ठोस माहिती नाही. फोनमध्ये 8GB of RAM असणार आहे.

फोनमधील कॅमेर्‍याचा विचार करता HMD Orka model मध्ये 108-megapixel main rear camera sensor असणार आहे. तर त्यामध्ये AI features असणार आहेत. फोन मध्ये 50-megapixel front camera sensor असणार आहे. यामध्ये 33W wired fast charging सपोर्ट असणार आहे. या फोनबाबतचे अन्य तपशील येत्या काही आठवड्यामध्ये ऑनलाईन समोर येण्याचा अंदाज आहे.

Comments
पुढील वाचा: HMD Orka, HMD Orka Design, HMD Orka Specifications
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »