Photo Credit: HMD
HMD Pulse series मधील HMD Pulse Pro हा Nokia चा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Android 15 software update आहे असे रिपोर्ट्स मधून समोर आले आहे. हा हॅन्डसेट एप्रिल महिन्यात लॉन्च झाला होता तर octa-core Unisoc T606 processor वर चालणारा हा Android 14 चा फोन आहे. दरम्यान लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट च्या माहितीनुसार, हा HMD Pulse Pro फोन Android 15 सह येणार आहे. ज्यामध्ये चांगला परफॉर्मन्स, बॅटरी अधिक वेगवान आहे. प्रायव्हसी आणि सिक्युरिटी अपग्रेड्स असणार आहेत.
NokiaMob report च्या माहितीनुसार, HMD Pulse Pro मध्ये Android 15 update आहे ज्याचे version 2.370 आहे. त्याची साईझ 3.12GB आहे. changelog च्या माहितीनुसार, optimised system performance आहे. यामध्ये अॅप लॉन्च स्पीड अधिक आहे. बॅटरी लाईफ मॅनेजमेंट सुधारलेले आहे.
हँडसेटला एक स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट सिस्टीम देखील मिळत असल्याची माहिती आहे, जी वापरण्याच्या पद्धती जाणून घेते आणि बॅटरीचे आयुष्य वाढवता येऊ शकते. Android 15 अपडेटनंतर, HMD Pulse Pro ला अधिक प्रगत सूचना नियंत्रण प्रणालीचा फायदा होऊ शकतो. अहवालानुसार, अॅप्स आणि इव्हेंट्स वर कंट्रोल देत हे फोकस सुधारत distractions कमी करणार आहेत.
अन्य बदलांमध्ये या अपडेट द्वारा अॅप परमिशन सुधारणार आहे, ऑटोमेटिक परमिशन रिसेट्स आणि data encryption सुधारणार आहे. डिसेंबर मध्ये Google's Android security patch येणार आहे.
HMD Pulse Pro प्रमाणेच अन्य दहा फोन मध्ये अपग्रेडस चा समावेश आहे. आता Android 15 ही ऑपरेटिंग सिस्टिम Nokia G42 5G,Nokia G60 5G,Nokia XR21 5G,Nokia X30 5G,HMD Pulse series,HMD Crest series,HMD Fusion,HMD Skyline,HMD XR21 5G,HMD T21 मध्येही असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात