सर्व्ह मध्ये निम्म्याहून अधिक पालकांना त्यांनी आपल्या मुलांना इतक्या लवकर वयात फोन दिली ही आपली चूक झाल्याचं कबूल केले आहे
Photo Credit: HMD
HMD said it is working on "a suite of new solutions which serve as viable alternatives to smartphones"
HMD ने नॉर्वे बेस्ड Xplora सोबत पार्टनरशिप केल्याची माहिती दिली आहे. याद्वारा ते लहान मुलांसाठी स्मार्टवॉच बनवणार आहेत. याद्वारा ते नव्या प्रकारचा फोन बनवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. जो स्मार्टफोनला पर्याय असणार आहे. हा फोन लहान मुलं आणि तरूणांसाठी असणार आहे. तरूणांना फोनचं वेगाने जडत जात असलेलं व्यसन लक्षात घेता आता या नव्या productivity-boosting device ची गरज असल्याची बाब एका अहवालामधून समोर आली आहे. कंपनीकडून अद्याप लॉन्च टाईम किंवा अन्य डिटेल्स जारी करण्यात आलेले नाहीत.
HMD ने एक प्रेस रीलीज जारी करत 29 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, आता ते Xplora सोबत काम करणार आहेत. ज्यामध्ये ते लहान मुलांसाठी फोन बनवण्याचं लक्ष्य ठेवून आहेत. युजर्स साठी आता ते एक "जबाबदार आणि जागरूक डिव्हाईस" बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.
HMD ने वर्षाच्या सुरूवातीला Better Phone Project लॉन्च केलेला आहे. 10 हजार पालकांचा समावेश असलेला हा एका ग्लोबल सर्व्हे आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक पालकांना त्यांनी आपल्या मुलांना इतक्या लवकर वयात फोन दिली ही आपली चूक झाल्याचं कबूल केले आहे. पालकांच्या माहितीनुसार, यामुळे त्यांच्या कौटुंबिक एकत्र असण्याच्या वेळेवर, स्लीप सायकल वर, व्यायाम करण्याच्या रूटीन वर आणि सोशलाईज होण्याच्या संधींवर वाईट परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.
HMD च्या माहितीनुसार आता ते स्मार्टफोनला एक नवा पर्याय म्हणून डिव्हाईस निर्माण करण्याकडे पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी HMD Skyline आणि HMD Fusion हॅन्डसेट्स मध्ये Detox Mode आणले होते. ज्याच्या माध्यमातून युजर्सना आता त्यांच्या स्क्रिन टाईम वर नियंत्रण ठेवणं सोप्प होणार आहे.
अद्याप HMD कडून कोणतीही या डिव्हाईस बाबत ठोस माहिती देण्यात आली नसली तरीही अपेक्षा अशी आहे की 2025 च्या Mobile World Congress मध्ये त्याची झलक पाहता येऊ शकते. ही Mobile World Congress मार्च महिन्यात आहे.
दरम्यान HMD आता HMD Sage smartphone लॉन्च करण्याच्या तयारी मध्ये आहे. ऑनलाईन त्याची झलक दिसली आहे. त्याचे डिझाईन HMD Skyline किंवा HMD Crest हॅन्डसेट प्रमाणेच आहे. Unisoc T760 5G वर तो चालण्याचा अंदाज आहे. यामध्ये 50-megapixel रेअर आणि सेल्फी कॅमेरा असेल आणि फास्ट चार्जिंग साठी 33W चा अॅडाप्टर आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Is Space Sticky? New Study Challenges Standard Dark Energy Theory
Sirai OTT Release: When, Where to Watch the Tamil Courtroom Drama Online
Wheel of Fortune India OTT Release: When, Where to Watch Akshay Kumar-Hosted Global Game Show