Honor 300 मध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset असण्याचा अंदाज tipster ने व्यक्त केला आहे
Photo Credit: Honor
Honor 300 निळ्या, राखाडी, जांभळ्या आणि पांढऱ्या शेड्समध्ये येण्यासाठी छेडले आहे
Honor 300 series लवकरच चीन मध्ये लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. या फोनच्या फीचर्सची माहील काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे. Honor 300 आणि Honor 300 Proची काही महत्त्वाची फीचर्स यापूर्वी लीक झालेली आहेत. सध्या लीक झालेला फोटो देखील बेस व्हेरिएंटचे डिझाईन असल्याचा अंदाज आहे. आता कंपनीकडून फोनचे रंग आणि Honor 300 च्या डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. आता फोनमध्ये रॅम आणि स्टोरेज काय असतील यासोबतच महत्त्वाच्या फीचर्सची tipster कडून माहिती देण्यात आली आहे.
Honor 300 डिझाईन हे Weibo वर पोस्ट करत कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीच्या आणखी एका पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की फोन Purple, Blue, White, Black, आणि Gray असे 5 रंग पर्याय असतील. जांभळा, निळा आणि पांढरा रंग मागील पॅनेलवर संगमरवरी पॅटर्नसह असणार आहे. तर Honor 300 Pro हा फोन Ink Rock Black, Chaka Green आणि Starlight Sand रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Honor 300 मागील पॅनेलच्या वरच्या डाव्या कोपर्यात षटकोनी मॉड्यूल पिल-आकाराच्या LED पॅनेलच्या बाजूने ड्युअल कॅमेरा युनिट असेल. कॅमेरा मॉड्यूलच्या एका बाजूला "Portrait Master" शब्द कोरलेले आहेत. हँडसेटच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर दिसत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये, कंपनीने सांगितले आहे की फोन 6.97mm जाडीचा असेल.
Honor 300 मध्ये 50-megapixel dual rear camera युनिट असणार आहे. असे Weibo पोस्ट मध्ये tipster Digital Chat Station ने सांगितले आहे. फोनमध्ये प्लॅस्टिक मिडल फ्रेम असण्याचा अंदाज आहे तर फ्लॅट डिस्प्ले असेल. 100W wired fast charging सपोर्ट सह हा फोन असणार आहे.
टिपस्टरच्या माहितीनुसार, बेस Honor 300 8GB+256GB, 12GB+256GB, 12+512GB आणि 16+512GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन असू शकते. मागील लीक्समध्ये असा दावा करण्यात आला होता की Honor 300 हँडसेटला Snapdragon 8 Gen 3 चिपसेट, 1.5K OLED स्क्रीन आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. प्रो प्रकारात 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप शूटर असू शकतो.
जाहिरात
जाहिरात
ISS Astronauts Celebrate Christmas in Orbit, Send Messages to Earth
Arctic Report Card Flags Fast Warming, Record Heat and New Risks
Battery Breakthrough Uses New Carbon Material to Boost Stability and Charging Speeds
Ek Deewane Ki Deewaniyat Is Streaming Now: Know Where to Watch the Romance Drama Online