Photo Credit: Honor
Honor MagicOS 9.0 चा मोबाईल आणि अन्य डिव्हाईस मधील अपडेट चीन मध्ये बुधवार 23 ऑक्टोबर दिवशी समोर आला आहे. हा अपडेट Android 15 वर बेस्ड आहे. या अपडेट मध्ये स्मार्टफोन आणि डिव्हाईस धरून एकूण 36 डिव्हाईस आहेत. Honor MagicOS 9.0 हा नोव्हेंबर 2024 मध्ये Magic V3, Magic Vs 3, Magic V2 series, Magic 6 series, Magic 5 seriesमध्ये असणार आहे. तर डिसेंबर 2024 मध्ये Magic Vs 2, Magic V Flip, Magic 4 series, Honor 200 series, MagicPad 2 tablet यामध्ये हा अपडेट असेल. जानेवारी 2025 मध्ये Magic Vs series, Magic V, Honor 100 series, Honor 90 GT, GT Pro tablet यात MagicOS 9.0 असेल आणि फेब्रूवारी 2025 मध्ये Honor 90 series, Honor 80 series तर मार्च 2025 मध्ये Honor X60 series, X50 यामध्ये अपडेट असेल.
Honor MagicOS 9.0 हा 20 लॉक स्क्रिन स्टाईल आणि कस्टमायझेशन ऑप्शन्स सह येणार आहे. यामध्ये 3 डी आणि anime elements निवडता येणार आहेत. यामध्ये स्मार्ट कॅप्सुल फीचर असणार आहे. त्याच्या मदतीने हवामानाचे अलर्ट्स मिळतील. फेस स्वॅप डिटेक्शन किंवा मेडिकल अपॉईंटमेंट्स घेता येणार आहेत. Honor ने अधिक intuitive animation engine दिले आहे. ज्याच्या मदतीने अधिक fluid interactions होणार आहेत. ज्यात होम स्क्रिन लेआऊट्स बदलता येणार आहेत. अॅप्स स्विच करता येतील आणि लॉक स्क्रिन वरही माहिती पाहता येईल. Turbo X Engine अपग्रेड करून unified rendering दरम्यान 11% उर्जेचा वापर करता येणार आहे.
Honor MagicOS 9.0 मध्ये AI features आहेत. त्यात AI Notes, AI Document आणि AI Translate ही फीचर्स आहेत. यामुळे आपोआप ट्रान्सस्क्राईब होणार आहे. भाषांतर देखील करता येणार आहे.
AI हा MagicOS 9.0 चा एक मोठा भाग आहे. हे फेस स्वॅप डिटेक्शन फीचर आहे जे युजर्सना व्हिडिओ कॉल किंवा इतर ऑनलाइन इंटरअॅक्शन दरम्यान डीपफेकपासून संरक्षण करण्यासाठी दावा केला जातो. YOYO एजंट — Honor चा AI assistant आहे. त्याच्या मदतीने देखील अनेक कामं करता येणार आहेत.
जाहिरात
जाहिरात