Photo Credit: Honor
Honor 90 GT चीन मध्ये डिसेंबर 2023 ला लॉन्च झाला आहे. आता या फोनचा उत्तराधिकारी लवकरच बाजारात येणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, Honor GT चं नवं प्रोडक्ट आता महिनाअखेरीस बाजारात येणार आहे. कंपनीकडून अद्याप याची माहिती दिलेली नाही. आगामी फोनच्या डिझाईनची समोर आलेली माहिती पाहता आता हा फोन Honor 100 GT असू शकतो असा अंदाज आहे. यापूर्वीच त्याच्या स्पेसिफिकेशन बाबतचे काही अंदाज समोर आले आहेत. या फोनमध्ये बॅटरी अपग्रेडेड असणार आहे तर चीपसेट हे सध्याच्या Honor 90 GT पेक्षा जास्तीचे असणार आहेत.
Honor ने Weibo पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवं Honor GT प्रोडक्ट चीन मध्ये 16 डिसेंबरच्या संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार, 7.30 ला लॉन्च होणार आहेत. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5 वाजता हा फोन लॉन्च होईल. आगामी फोनचं नाव देखील समोर आलेलं नाही. पण अंदाज पाहता हा फोन Honor 100 GT असू शकतो.
पोस्टच्या माहितीमध्ये Honor GT चं डिझाईन समोर आलं आहे. त्यामध्ये आयताकृती रेअर कॅमेरा आहे. तसेच दोन कॅमेरा सेन्सर्स आहे. गोळीच्या आकारात LED unit आहे. एका कोपर्या मध्ये "GT" कोरलं आहे. टीझरच्या माहितीनुसार, हा फोन पांढरा आणि सिल्वर रंगामध्ये उपलब्ध आहे. हा फोन MagicOS वर चालणारा आहे.
Honor 100 GT मध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset चा विचार करता ही high-density silicon बॅटरी असू शकते. त्यामध्ये flat LTPS display असणार असून 1.5K resolution आणि eye-protection technology आहे.
Honor 100 GT मध्ये 50-megapixel Sony "IMX9xx" primary rear sensor असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये सुरक्षेचा विचार करता तो 3D ultrasonic fingerprint sensor आहे. Honor 90 GT मध्ये 50-megapixel dual rear camera system आहे. सोबत Sony IMX800 main camera sensor आहे. फोनचा डिस्प्ले 6.7-inch full-HD+ (2,664 x 1,200 pixels) OLED screen सह आहे. तर Snapdragon 8 Gen 2 chipset आहे आणि 5,000mAh battery तसेच 100W fast charging support आहे. सुरक्षेचा विचार करता side-mounted fingerprint sensor आहे.
जाहिरात
जाहिरात