Honor या स्मार्टफोन कंपनीने नुकताच त्यांचा magic 6 pro हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आणि आता 2024 हे वर्ष संपण्यापूर्वीच Honor आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक गोड बातमी घेऊन आला आहे, हे म्हणायला हरकत नाही. 2024 या वर्षाच्या शेवटी Honor आपला अजून एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, तो म्हणजे Honor Magic 7 Pro. ज्याचे रेंडर आणि कॅमेराबद्दलची माहिती नुकतीच लॉन्च झाली आहे. चला तर बघुयात, काय आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये.
Honor Magic 7 Pro लॉन्च होण्याची तारीख आणि कॅमेरा.
Honor Magic 7 Pro बद्दल ऐकताच वापरकर्त्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे की, हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च होणार आहे. परंतु सध्यातरी Honor या कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्च बद्दल कोणतीही स्पष्टता दिलेली नसून अंदाजे हा स्मार्टफोन भारतात नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा होण्याचे एकमेव कारण म्हणजे या स्मार्टफोनचा कॅमेरा.
नुकताच Tipster द्वारे लीक झालेल्या Honor Magic 7 Pro या स्मार्टफोनच्या रेंडर अनुसार या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेऱ्यांचा सेट अप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 180 किंवा 200 मेगापिक्सेलचा असू शकतो. त्यासोबतच Samsung HP3 पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर सुध्दा असणार आहे. LiDAR सेन्सर, LED फ्लॅश, Color Temperature सेन्सर, तसेच 50 मेगापिक्सेल Omni Vision OV50K चा मुख्य आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड सेन्सर देखील बसविण्यात येणार आहे.Honor Magic 7 Pro ची वैशिष्ट्ये.
Honor Magic 7 Pro हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसरचे समर्थन करणारा स्मार्टफोन असेल असा अंदाज आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेऱ्यांचा सेटअप सुध्दा देण्यात आलेला आहे, जे या स्मार्टफोनचे सर्वात मुख्य वैशिष्टय असणार आहे. यामध्ये 3D फेस रेकग्निशन सेन्सर सोबतच थोडासा वक्र डिस्प्ले सुध्दा बसविण्यात आला आहे.
Honor Magic 7 Pro चा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटसोबतच 1.5k रेसोल्युशन सह OLED डिस्प्ले असणार असून हा किती इंचाचा असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. Honor ने अलीकडेच लॉन्च केलेल्या magic 6 pro या स्मार्टफोनचा पुढचा स्मार्टफोन असल्याने या स्मार्टफोनची बॅटरी थोडी अपग्रेडेड असू शकते. जी 6000 mAh पर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या स्मार्टफोनची बरीचशी वैशिष्ट्ये लिक झालेल्या रेंडर मधून समोर आलेली नाही आहेत. त्याशिवाय Honor या स्मार्टफोन कंपनीकडून देखील या स्मार्टफोन बद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु magic 6 pro चा पुढील स्मार्टफोन सुध्दा या सिरीजच्या स्मार्टफोन्स सोबत लॉन्च होऊ शकतो. Honor स्मार्टफोनचे आगामी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडून रहा.