Photo Credit: Honor
Honor Magic 7 RSR Porsche Design हा चीन मध्ये लॉन्च झालेला Magic 7 series मधील तिसरा फोन आहे. नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोनमध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite Extreme Edition chipset असणार आहे. तर 5,850mAh बॅटरी आहे. त्याला wired आणि wireless charging सपोर्ट असणार आहे. Honor Magic 7 RSR Porsche Design हा Porsche cars शी साधर्म्य साधणारा आहे.
Honor Magic 7 RSR Porsche Design ची किंमत CNY 7,999 (Rs. 93,000) आहे. ही किंमत 16GB+512GB version साठी आहे. तर 24GB+1TB version ची किंमत CNY 8,999 (Rs. 1,05,000) आहे. हा फोन Agate Gray आणि Provence Purple रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Honor Magic 7 RSR Porsche हा Android 15-based MagicOS 9.0 skinवर चालतो तर त्यामध्ये 6.8-inch full-HD+ (1,280 x 2,800 pixels) LTPO OLED screen आहे. 120Hz refresh rate, 453ppi pixel density,1,600 nits of global peak brightness असणार आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Extreme Edition chipset ही 24GB of RAM आणि 1TB of storage सोबत जोडलेली आहे.
Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये triple rear camera unit असणार आहे. त्यामध्ये 50-megapixel primary sensor असणार आहे तर 50-megapixel ultra wide-angle camera तसेच 200-megapixel periscope telephoto camera असणार आहे. त्यामध्ये 100x digital zoom आणि 3x optical zoom असणार आहे. 50-megapixel wide-angle camera मध्ये 3D depth camera असेल.
फोनमधील कनेक्टिव्हिटीचा विचार करता Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS/AGPS, Galileo, GLONASS, Beidou, NFC, OTG, आणि USB Type-C port असणार आहे. फोनमधील 3D ultrasonic fingerprint sensor असेल.
Honor Magic 7 RSR Porsche Design मध्ये 5,850mAh battery असणार आहे. सोबत 100W wired आणि 80W wireless fast charging सपोर्ट असणार आहे.
जाहिरात
जाहिरात