Honor Magic 8 Lite मध्ये Snapdragon chip असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Photo Credit: Honor
ऑनर मॅजिक ८ लाइट हा ऑनर मॅजिक ७ लाइटची जागा घेईल
Honor कडून 15 ऑक्टोबर दिवशी Magic 8 आणि Magic 8 Pro स्मार्टफोन्सची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आता तिसरं मॉडेल Honor Magic 8 Lite ची चर्चा सुरू आहे. लवकरच हे मॉडेल देखील या लाईनअप मध्ये जोडले जाणार आहे. Honor कडून अद्याप Magic 8 series मधील तिसर्या मॉडेलची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ऑनलाईन माहितीनुसार, Honor Magic 8 Lite मध्ये 6.79 इंचाची AMOLED display आहे. हा Snapdragon chipset वर चालतो आणि त्यामध्ये 7,500mAh बॅटरी असण्याचा अंदाज आहे.Honor Magic 8 Lite मध्ये काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स?product database platform Icecat वरील माहितीनुसार, Honor Magic 8 Lite मध्ये काही प्रमुख फीचर्सचा समावेश आहे. लिस्टिंगनुसार, ड्युअल सिम (नॅनो+eSIM) हँडसेट MagicOS 9.0 वर चालतो आणि त्यात 6.79-इंचाचा फ्लॅट 1.5K AMOLED डिस्प्ले आहे.
Honor Magic 8 Lite मध्ये Snapdragon chipset, 8GB RAM आणि 512GB onboard storage असल्याचे दिसून येते. यात ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असल्याचे दिसून आले आहे.
लिस्टिंगनुसार, Honor Magic 8 Lite मध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type-C port उपलब्ध आहेत. बोर्डवरील सेन्सर्समध्ये ambient light sensor, gyroscope, gravity sensor, आणि proximity sensor यांचा समावेश आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील असण्याची अपेक्षा आहे. या यादीत 7,500mAh बॅटरीस Honor Magic 8 Lite दाखवण्यात आला आहे. हा एकाच मिडनाइट ब्लॅक रंगाच्या पर्यायात लिस्ट करण्यात आला आहे.
कंपनीच्या नवीन मॅजिक सीरीज मध्ये तिसरा स्मार्टफोन म्हणून Honor Magic 8 Lite हा स्मार्टफोन येऊ शकतो. Honor Magic 8 आणि Honor Magic 8 Pro हे स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला चीनी बाजारात लाँच करण्यात आले होते. हे स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालणार आहेत. हे 16GB of RAM आणि 1TB of storage क्षमतेचे आहेत.
Honor Magic 8 आणि Magic 8 Pro या दोन्ही मॉडेल्समध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. 50 MP प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट्स आहेत. Honor Magic 8 Pro मध्ये 7,200mAh बॅटरी आहे, तर Magic 8 model मध्ये 7,000mAh बॅटरी आहे.
जाहिरात
जाहिरात
Nothing Phone 3a Lite Launch Date Confirmed: See Expected Specifications, Price
Lava Shark 2 4G Launched in India With 5,000mAh Battery, 50-Megapixel Rear Camera: Price, Specifications