दोन्ही हॅन्डसेट्स मध्ये MagicOS 10 आहेत. जे Android 16 वर चालतात आणि स्मार्टफोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
Photo Credit: Honor
Honor Magic 8 मध्ये 50MP प्रायमरी, 50MP अल्ट्रાવाईड आणि 200MP टेलिफोटो कॅमेरा आहे
Honor कडून नवा फ्लॅगशीप Magic 8 lineup चीन मध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये Magic 8 आणि Magic 8 Pro स्मार्टफोनचा समावेश आहे. दोन्ही फोन Qualcomm च्या फ्लॅगशीप Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालतात. त्यासोबत 16GB of RAM आणि 1TB of built-in storage चा समावेश आहे. त्यासोबतच या हॅन्डसेट्स मध्ये MagicOS 10 आहेत. जे Android 16 वर चालतात आणि स्मार्टफोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
Honor Magic 8 ची किंमत CNY 4,499 (Rs 55,000) ही बेस मॉडेल 12GB RAM + 256GB RAM स्टोरेज पासून सुरू होते. यामध्ये अजून 3 व्हेरिएंट्स आहेत यामध्ये टॉप व्हेरिएंटसाठी CNY 6,699 (Rs. 83,000) मोजावे लागणार आहेत. दोन्ही फोन्स हे 4 रंगांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या चीन मध्ये या फोन्सची प्री ऑर्डर सुरू झाली आहे. मात्र ग्लोबल मार्केट मध्ये फोन कधी येणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
Honor Magic 8 आणि Magic 8 Pro स्मार्टफोन्स हे Snapdragon 8 Elite Gen 5 SoC वर चालणार आहेत ते 16GB LPDDR5X RAM आणि 1TB UFS 4.0 storage सोबत जोडलेले आहेत. हा स्मार्टफोन MagicOS 10 वर चालतो. Honor Magic 8 मध्ये 6.58-inch LTPO quad curved display असून 1.5K screen resolution आहे. Honor Magic 8 Pro मध्ये 6.71-inch LTPO quad curved display असून 120Hz refresh rate आहे.
Honor Magic 8 मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट आहे. त्यामध्ये 50MP प्रायमरी, 50MP अल्ट्रावाईड आणि 200 MP टेलिफोटो कॅमेरा आहे. सोबत 3x optical zoom ते 100x digital zoom आहे. सेल्फीसाठी Honor Magic 8 मध्ये 50MP front-facing camera आहे. Honor Magic 8 Proमध्ये 200MP telephoto lens चा समावेश असून 3.7x optical zoom आणि 100X digital zoom आहे. Magic 8 मध्ये 7000 mAh battery चा समावेश आहे. सोबत 90W wired आणि 80W wireless charging आहे. Magic 8 Pro ची बॅटरी 7200 mAh ची आहे. त्याला 100W wired आणि 80W wireless charging सपोर्ट आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Redmi Turbo 5, Redmi Turbo 5 Pro to Be Equipped With Upcoming MediaTek Dimensity Chips, Tipster Claims