Photo Credit: Honor
ऑनर पॉवरमध्ये ५०-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे
Honor Power चीन मध्ये मंगळवारी लॉन्च झाला आहे. नव्या Honor smartphone मध्ये 8,000mAh battery आहे. त्याला 66W wired charging चा सपोर्ट आहे. Honor Power मध्ये Snapdragon 7 Gen 3 chipset चा समावेश आहे. सोबत 12GB RAM आणि कमाल 512GB storage आहे. या फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50-megapixel primary camera आहे. Honor Power मध्ये कंपनीची स्वयं-विकसित C1+ कम्युनिकेशन चिप आहे जी कमकुवत नेटवर्क वातावरणात stable communication देते. फोनचा टॉप मेमरी व्हेरिएंट Beidou च्या टू-वे सॅटेलाइट टेक्स्ट मेसेजिंगला सपोर्ट करतो.Honor Power ची किंमत काय?Honor Power ची किंमत 8GB RAM + 256GB storage model या बेस मॉडेल साठी CNY 1,999 (23 हजार रूपये अंदाजे) आहे. 12GB + 256GB आणि 12GB + 512GB RAM या व्हेरिएंट ची किंमत अनुक्रमे CNY 2,199 (25 हजार रूपये अंदाजे) आणि CNY 2,499 (30 हजार रूपये अंदाजे) आहे. हा फोन Desert Gold, Phantom Night Black, आणि Snow White रंगांमध्ये उपलब्ध आहे. सध्या हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Honor Power हा ड्युअल सीम फोन आहे. तो MagicOS 9.0 बेस्ड ऑन Android 15 वर चालतो. यामध्ये 6.78-inch 1.5K(1,224x2,700 pixels) AMOLED display आहे. 120Hz refresh rate आणि HDR support आहे. Oasis eye protection gaming screen असल्याने 3840Hz PWM dimming आणि 4,000nits peak brightness मिळतो. हा फोन octa-core Snapdragon 7 Gen 3 SoC वर चालतो. Adreno 720 GPU आणि 12GB of RAM, 512GB of storage ची क्षमता असणारा फोन आहे.
फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 50-megapixel primary camera, 5-megapixel ultra-wide angle sensor आणि फ्रंटला 16-megapixel camera आहे.
Honor Power मध्ये कनेक्टिव्हिटी साठी Bluetooth 5.3, GPS, Beidou, GLONASS, Galileo, NFC, OTG, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax/be, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये accelerometer, ambient light sensor, e-compass, IR sensor, gravity sensor, gyroscope, आणि proximity sensor आहे. biometric authentication साठी in-display fingerprint sensor आहे. फोनमध्ये Taichi shock-absorbing structure 2.0 आहे.
जाहिरात
जाहिरात