Honor X7c 5G हा Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध असेल आणि ई-कॉमर्स वेबसाइट वर खरेदी करणार्यांना सहा महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील दिला जात आहे.
Photo Credit: Honor
Honor X7c 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे
चायनीज स्मार्टफोन कंपनी Honor ने भारतात X7c 5G स्मार्टफोन लाँच करून त्यांच्या X मालिकेमध्ये नव्या स्मार्टफोनची भर केली आहे. Honor X7c 5G या स्मार्टफोन मध्ये Snapdragon chipset आहे. फोनमध्ये 35W फास्ट वायर्ड चार्जिंगसह 5200mAh बॅटरी चा समावेश आहे. शिवाय Honor X7c 5G हा Android 14 वर आधारित MagicOS 8.0 वर चालतो. Xiaomi, Realme आणि Vivo सारख्या ब्रँडच्या 15 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीच्या इतर बजेट 5G स्मार्टफोन्सना Honor X7c 5G हा टक्कर देईल. मग Honor X7 5 बद्दल अधिक माहिती, फीचर्स, किंमत आणि फोन विक्रीसाठी कधी खुला होणार? हे सारे अपडेट्स नक्की जाणून घ्या.
Honor X7c 5G स्मार्टफोनची किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या एकमेव मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे आणि Honor X7c 5G हा फोन 20 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी खुला होईल. ई-कॉमर्स वेबसाइट वरून Honor X7c 5G खरेदी करणार्या ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील दिला जात आहे. Honor X7c 5G हा स्मार्टफोन Forest Green आणि Moonlight White या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Honor X7c 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 850 nits peak brightness सह 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 processor ने सुसज्ज आहे, 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 3.1 सह येतो आणि Android 14 वर आधारित MagicOS 8.0 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. समोर, तो 5MP सेल्फी कॅमेरासह येतो. मोबाईलच्या बॅक पॅनलमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
स्मार्टफोन मध्ये 5200mAh बॅटरी आहे जी 35W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. शिवाय, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, IP64-रेटेड बिल्ड आणि स्टीरिओ स्पीकर्स आहेत. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, 3.5mm audio jack आणि USB-C पोर्ट यांचा समावेश आहे.हा फोनSwiss SGS premium performance certification सह येईल, ज्यामध्ये ड्रॉप आणि क्रश रेझिस्टन्स असेल.
जाहिरात
जाहिरात