Photo Credit: Honor
ऑनर एक्स९सी ५जी भारतात जेड सायन आणि टायटॅनियम ब्लॅक रंगात विकला जाईल
Honor कडून त्यांचा आगामी स्मार्टफोन Honor X9C ची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 7 जुलैला लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. Amazon वर त्याची एक्सक्लुझिव्ह विक्री होणार आहे. बाजारात Honor X9C हा फोन विक्रीसाठी येण्यापूर्वी त्याची काही स्पेसिफिकेशन्स, रंगांचे पर्याय, स्टोरेज ऑप्शन्स, प्रोसेसर्स, डिस्प्ले आणि कॅमेरा डिटेल्स समोर येणार आहेत. Honor च्या माहितीनुसार, हा नवीन फोन 12 जुलै रोजी अमेझॉनवर भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. अशी माहिती फोन कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन बाजारात येण्यापूर्वीच जाणून घ्या त्याबद्दलची सारी माहिती.Honor X9C ची स्पेसिफिकेशन्स काय?Honor X9C मध्ये 6.78-inch 1.5K curved AMOLED display आणि 120Hz refresh rate तसेच 3840Hz PWM dimming असणार आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 processor असणार आहे. हा प्रोसेसर यापूर्वी Oppo F29 आणि Realme P1 Pro मध्ये वापरला गेला होता. X9C हा 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, जरी त्याचे अतिरिक्त व्हेरिएंट दिले जातील की नाही हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. Android 15, वर आधारित MagicOS 9 चालवणारा, हा फोन नवीन स्किनमध्ये AI पॉवर्ड फीचर सह येणार आहे.
Honor X9C स्मार्टफोनमधील कॅमेरा पाहता त्यात 108MP Primary Camera आणि OIS व EIS असणार आहे. कंपनीने अतिरिक्त कॅमेरा सेन्सर्सची माहिती दिलेली नसली तरी, डिव्हाइसच्या ग्लोबल काऊंटरपार्टने असे सुचवले आहे की त्यात 5MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असू शकतो.
Honor X9C फोन पाणी आणि धूळी पासून फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी IP65 रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तो पाण्याचा स्प्लॅश आणि हलका पाऊस सहन करू शकेल परंतु पाण्यात पूर्णपणे बुडणार नाही. फोनमध्ये 6600mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी असेल जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Honor X9C मध्ये flicker-free परफॉर्मन्स आणि low blue light standards साठी TÜV Rheinland certifications देखील मिळतील.
Honor X9C ची जाडी 7.98 मिमी असेल आणि त्याचे वजन 200 ग्रॅमपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.Honor X9C हा स्मार्टफोन Titanium Black आणि Jade Cyan या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
जाहिरात
जाहिरात