Tecno Spark Go 5G हा AI-driven features असलेला फोन असून त्यामध्ये भारतीय भाषांना सपोर्ट असलेल्या Ella AI असिस्टंटचा समावेश असणार आहे.
Photo Credit: Tecno
Tecno Spark Go 5G मध्ये 6,000mAh बॅटरी असेल
TECNO कडून आगामी स्मार्टफोन Spark Go 5G ची घोषणा करण्यात आली आहे. हा टेक्नो कंपनीचा बजेट 5 जी स्मार्टफोन असणार आहे. भारतात Spark Go 5G हा 14 ऑगस्ट दिवशी लॉन्च होणार आहे. Spark Go 2 हा जून महिन्यात आल्यानंतर आता Spark Go 5G काही दिवसांतच लॉन्च होणार आहे. फोनचा अधिकृत टीझर समोर आला आहे. त्यामध्ये Spark Go 5G हा स्मार्टफोन स्लीक आणि मॉर्डन डिझाईन मध्ये दिसणार आहे. हा फोन परफॉर्ममन्स सोबतच अस्थेटिक डिझाईन वरही विशेष लक्ष देऊन बाजारात येत असल्याचं दिसत आहे.TECNO कंपनीच्या दाव्यानुसार, Spark Go 5G हा भारतामधील 'slimmest आणि lightest 5G smartphone' असणार आहे. हा फोन केवळ 7.99mm जाडीचा आहे तर वजनाला केवळ 194 ग्राम आहे. हा फोन हाताळण्यासाठी अत्यंत आरामदायी आणि सहजसोपा असणार आहे. फोन मध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी फोन 5G carrier aggregation ला सपोर्ट करणार आहे. तर फोन वेगवान आणि खात्रीशीर नेटवर्क परफॉर्मन्स देणारा असेल असाही कंपनीचा विश्वास आहे. ब्लूटूथद्वारे नेटवर्क नसतानाही मजकूर आणि कॉल घेता येणार आहे.
TECNO Spark Go 5G मध्ये 6000mAh battery चा समावेश आहे. कंपनीकडून फोनच्या बॅटरीच्या क्षमतेची पुष्टी केलेली आहे त्यामुळे आता 'बॅटरी लवकर संपते' ही काळजीच या स्मार्टफोन मध्ये संपणार आहे. हा फोन AI-driven features मध्येही दमदार आहे. यामध्ये “Ella AI” असिस्टंटचा समावेश आहे. हा भारतीय भाषांनाही सपोर्ट करतो. तर या स्मार्टफोनमध्ये “Circle to Search” चा देखील समावेश आहे. प्रोडक्टीव्हिटी सुधारण्यासाठी यामध्ये AI writing assistant चा देखील समावेश आहे.
TECNO Spark Go 5G हा लॉन्च नंतर अमेझॉन, फ्लिपकार्टवर वर खरेदीसाठी खुला असणार आहे. दरम्यान Amazon microsite च्या माहितीनुसार, 14 ऑगस्टला हा फोन दुपारी 12 च्या सुमारास लॉन्च होईल. फिलीपिन्ससह इतर प्रदेशांमध्ये या फोनची उपलब्धता अद्याप निश्चित झालेली नाही. TECNO Spark Go 5G मधील महत्त्वाची फीचर्स समोर आली आहेत. मात्र अद्याप फोनचा प्रोसेसर, डीस्प्ले आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन यांची माहिती समोर आलेली नाही. त्याची लवकरच घोषणा होणार आहे.
एका टीझरनुसार, TECNO Spark Go 5G मध्ये आडव्या रेषेत कॅमेरा अलाइनमेंट असल्याचं डिझाइन दिसत आहे. हा फोन काळा, हिरवा, जांभळा आणि निळा रंगात उपलब्ध असण्याचा अंदाज आहे. दरम्यान फोनच्या लाँचिंगला आता काही दिवसच उरले आहेत, त्यामुळे सर्वांच्या नजरा TECNO कडून करण्यात आलेल्या त्यांच्या धाडसी दाव्यांशी जुळणारा फोन ते देणार का? याकडे लागले आहे.
जाहिरात
जाहिरात