Infinix Hot 60i 5G मध्ये Dimensity 6400 प्रोसेसर, AI कॅमेरा आणि ब्लूटूथ वॉकी-टॉकी मोड आदींचा समावेश असणार आहे.
Photo Credit: Flipkart
Infinix Hot 60i 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि मॅट फिनिश बॅक पॅनल असेल
Infinix कडून त्यांचा Hot 60i 5G भारतामध्ये 16 ऑगस्टला लॉन्च केला जाणार आहे. फ्लिपकार्टवरील डिव्हाइससाठी बनवण्यात आलेल्या खास पेजवर लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. सध्या या स्मार्टफोनच्या रिलीजपूर्वी त्यामधील अनेक प्रमुख फीचर्स आणि फीचर्सची पुष्टी केली आहे. हा हँडसेट फ्लिपकार्ट आणि Infinix च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी खुला असणार आहे. मग जाणून घ्या Infinix Hot 60i 5G बद्दल खास अपडेट्स, रंगांचे पर्याय आणि अन्य महत्त्वाची माहिती.Infinix Hot 60i 5G हा स्मार्टफोन लॉन्च नंतर चार रंगांमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये Shadow Blue, Monsoon Green, Sleek Black, आणि Plum Red या रंगांचा समावेश आहे. Infinix Hot 60i चे 4G version जून महिन्यात बांग्लादेश मध्ये लॉन्च झाले आहे त्यानंतर आता हा फोन भारतात 5 जी मध्ये लॉन्च केला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio chipset चा समावेश आहे. बांग्लादेश मध्ये 4जी व्हर्जनची किंमत BDT 13,999 म्हणजे भारतीय रूपयांमध्ये सुमारे दहा हजार आहे. हा स्मार्टफोन 6GB of RAM and 128GB storage variant मध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान भारतात अपेक्षित असणारा 5जी व्हेरिएंट याच किंमतीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्तीच्या किंमतीमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
Infinix Hot 60i 5G हा स्मार्टफोन 6.75-inch डिस्प्ले सह HD+ resolution आणि 120Hz refresh rate सह उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. या बॅटरीच्या माध्यमातून 128 तासांचा म्युझिक प्लेबॅक मिळू शकतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Dimensity 6400 chipset चा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन XOS 15 या Android 15 वर चालतो. फोटोग्राफीसाठी
Infinix Hot 60i 5G मध्ये 50MP primary camera आहे. तर ड्युअल एलईडी फ्लॅश सपोर्ट आहे. कॅमेरा मध्ये HDR आणि panorama modes चा देखील समावेश करण्यात आला आहे. रेअर पॅनल वर आयताकृती कॅमेरा असून तो मॅट फिनिश सह आहे.
Hot 60i 5G हा IP64 रेटींग सह येत असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये Bluetooth-बेस्ड walkie-talkie connectivity आहे. One-Tap Infinix AI चा देखील यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजंस टूल्सचा वापर करून काही कामं देखील केली जाऊ शकतात.
जाहिरात
जाहिरात