Infinix हा स्मार्टफोनच्या जगातल्या बादशाह नुकत्याच आपल्या अजून एक सैनिकाला म्हणजेच Infinix Note 40x ह्या स्मार्टफोनला भारतात लॉन्च करत आहे. रोजच्या वापरकर्त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचं आयुष्य अजून सुकर करण्याचे काम हा स्मार्टफोन करण्यास सक्षम आहे. हा स्मार्टफोन भारतात 5 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार असून लाइम ग्रीन, ब्लू आणि स्टारलिट ब्लॅक ह्या तीन आकर्षक रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. चला तर मग बघुयात काय वैशिष्ट्ये असणार आहेत, Infinix Note 40x मध्ये.
Infinix Note 40x ची डिझाइन.
Infinix Note 40x ह्या स्मार्टफोनचा समोरील कॅमेरा मध्यभागी असणार असून मागच्या बाजूला ट्रीपल कॅमेरा फ्लॅश सोबत आयताकृती डिझाइनमध्ये जोडण्यात आला आहे. ह्याची स्लिक डिझाइन सर्व बाजूंनी सपाट आहे. हा स्मार्टफोन हातात घेताच आपल्याला एका आधुनिक विश्वातील स्मार्टफोनची जाणीव करून देण्यासाठी पूरक आहे.
Infinix Note 40x ची वैशिष्ट्ये.
Infinix Note 40x डिस्प्ले हा 6.78 इंचाचा असून फुल HD+ देण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन Media Tek Dimensity 6300 ह्या प्रोसेसरद्वारे आणि Android 14 ने समर्थित आहे. 256 GB स्टोरेज सोबत 12GB रॅम आणि सर्व ॲप्लिकेशन सोबत अगदी सहजपणे चालण्याची हमी हा स्मार्टफोन देतो.
तुम्हाला सुद्धा जर फोटोग्राफीचे वेड असेल तर हा स्मार्टफोन विकत घेण्यापासून तुम्ही स्वतःला अडवू सुद्धा शकणार नाहीत. कारण Infinix Note 40x घेऊन आला आहे 108 मेगापिक्सलचा मागील प्राथमिक कॅमेरा. 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 15 वेगवेगळे मोड असणारी रिंग फ्लॅश लाईट सुद्धा ह्यात देण्यात आली आहे. सोबतच ह्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा मिळणार आहे. Infinix Note 40x चा कॅमेरा हा फक्त तुमचे फोटो काढायचे काम नाही करणार तर AI तंत्रज्ञाना सोबत तुमचे फोटो कोणत्याही एडिटर शिवाय एडिट सुद्धा करेल.
Infinix Note 40x हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीला समर्थन देतो. ह्यात USB-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि NFC समर्थन सुद्धा देण्यात आले आहे. ह्याच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये DTS-ट्यून केलेले ड्युअल स्पीकर, साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 5000 mAh असून 18 वॅट च्या चार्जिंगचे समर्थन करते ज्याचा मुख्य फायदा तुम्हाला असा होतो की, तुमचा स्मा्टफोन तर जलदगतीने चार्ज होतोच पण त्याची बॅटरी ही जास्त काळ टिकून सुद्धा राहते.
Infinix Note 40x ह्या स्मार्टफोनची किंमत भारतात अंदाजे 10 हजारांच्या आसपास असू शकते. ह्या स्मार्टफोनची नक्की किंमत काय असेल ह्याबाबत सर्व आवश्यक माहिती तो लॉन्च झाल्यानंतरच कळेल.