Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये काय खास? घ्या जाणून स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये काय खास? घ्या जाणून  स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Infinix

Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये OIS सह 50-मेगापिक्सेल Sony IMX896 प्राथमिक कॅमेरा आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये 50-megapixel Sony IMX896 camera आहे
  • Infinix Note 50 आणि Infinix Note 50 Pro Indonesia मध्ये उपलब्ध आहे
  • फोनमध्ये 5,200mAh battery आहे
जाहिरात

Infinix ने Note 50 Pro+ 5G जगभर लॉन्च केला आहे. हा हॅन्डसेट MediaTek Dimensity 8350 Ultimate chip वर चालणार आहे. फोनमध्ये AMOLED display आहे. Infinix Note 50 Pro+ 5G हा Note 50 series मधील तिसरा स्मार्टफोन आहे. Infinix Note 50 आणि Note 50 Pro इंडोनेशियन मार्केट मध्ये यापूर्वीच लॉन्च झाले आहेत. Infinix ने वर्षअखेरीपर्यंत नक्की 5G Note 50 series models येईल असे सांगितले होते. Infinix Note 50 Pro+ 5G हा Infinix AI features वर चालतो तर यामध्ये 5,200mAh battery आहे. सोबतच फोनला 100W wired charging आणि wireless charging चा सपोर्ट आहे.

Infinix Note 50 Pro+ 5G ची किंमत काय?

Infinix Note 50 Pro+ 5G ची अमेरिकेमध्ये किंमत 370 डॉलर अर्थात 32,000 रूपयांपासून सुरू होते. जगभरामध्ये हा फोन Purple, Titanium Grey आणि Special Racing Edition versions मध्ये उपलब्ध असणार आहे.

Infinix Note 50 आणि Infinix Note 50 Pro हे स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये Infinix Note 50 Pro+ 5G सोबत अनुक्रमे $180 (अंदाजे रु. 15,000) आणि $210 (अंदाजे रु. 18,000) पासून सुरू होणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये ते लाँच करण्यात आले. Infinix नंतर Note 50 मालिकेतील दोन नवीन 5G स्मार्टफोनची घोषणा करेल.

Infinix Note 50 Pro+ 5G ची स्पेसिफिकेशन काय?

Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये 6.78-inch AMOLED display आहे. 1,300 nits peak brightness आहे. स्क्रीन मध्ये TÜV Rheinland low blue light certification आहे. Bio-Active Halo AI lighting system आहे जी कॉल, नोटिफिकेशन्स आणि इतर गोष्टींसाठी मल्टी-कलर मिनी-एलईडी इफेक्ट्स दाखवते.Infinix Note 50 Pro+ 5G हा MediaTek Dimensity 8350 Ultimate चिपवर चालतो.

Note 50 Pro+ 5G मध्ये 50-megapixel Sony IMX896 primary camera आहे. 8-megapixel ultra-wide angle lens आहे. 50-megapixel periscope telephoto lens आहे. Note 50 Pro+ 5G मध्ये 5,200mAh battery आहे जी 100 वॅट वायर्ड चार्जिंग, 10 वॅट वायरलेस चार्जिंग आणि 7.5 वॅट वायरलेस रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. पॉवर रिझर्व्ह मोडमध्ये 1 टक्के बॅटरीसह ही बॅटरी 2.2 तासांपर्यंत टॉक देते असा दावा केला जातो.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »